नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Thursday, May 30, 2013

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१२-२०१३

कृषी संलग्न क्षेत्रातील वाढीचा दर उणा (निगेटीव्ह) :
  •  स्थिर किमतीनुसार 2010-11 मधील स्थूल राज्य उत्पन्नात (रु.7,35,212 कोटी) 7.1 टक्के वाढ होऊन ते 2011-12 मध्ये रु. 7,87,426 कोटी इतके वाढले. हा वाढीचा दर 8.5 टक्के असेल असे अपेक्षित होते.
  • 2011-12च्या तुलनेत 2012-13 मध्येही स्थूल राज्य उत्पन्न  वाढीचा दर  7.1 टक्के एवढाच अपेक्षित असून  उत्पन्न  रु.8,43,565 कोटी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
  • 2012-13 या वर्षी कृषी संलग्न क्षेत्रातील वाढीचा दर उणे (-) 2.1 टक्के, उद्योग क्षेत्रातील वाढीचा दर 7.0 टक्के सेवा क्षेत्रातील वाढीचा दर 8.5 टक्के असा राहील.
  • 2011-12 मध्ये (चालू किमतीनुसार) देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील राज्याचा हिस्सा 14.4 टक्के आहे.

2011-12साठी चालू किमतीनुसार जिह्यांचे दरडोई उत्पन्न

जिल्हा
दरडोई उत्पन्न (रुपये)

जिल्हा
दरडोई उत्पन्न (रुपये)
मुंबई शहर
1,51,608
नाशिक
91,673
ठाणे
1,40,608
धुळे
66,140
रायगड
1,18,885
नंदुरबार
46,156
रत्नागिरी
77,521
जळगाव
75,956
सिंधुदुर्ग
81,201
अहमदनगर
75,233
कोकण विभाग
1,38,606
नाशिक विभाग
77,358
पुणे
1,40,570
औरंगाबाद
91,100
सातारा
80,671
जालना
55,067
सांगली
80,709
परभणी
58,512
सोलापूर
74,856
हिंगोली
46,190
कोल्हापूर
1,01,014
बीड
55,139
पुणे विभाग
1,05,511
नांदेड
52,583
वर्धा
68,085
उस्मानाबाद
54,833
नागपूर
1,00,663
लातूर
59,396
भंडारा
60,764
औरंगाबाद विभाग
61,789
गोंदिया
53,802
बुलढाणा
50,772
चंद्रपूर
73,328
अकोला
61,423
गडचिरोली
48,311
वाशिम
55,200
नागपूर विभाग
78,063
अमरावती
63,467



यवतमाळ
54,497



अमरावती विभाग
57,280

दरडोई उत्पन्नातील विषमता: 
  • चालू किमतीनुसार 2011-12 मध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्न रु.61,564 तर दरडोई राज्य उत्पन्न रु.95,339 इतके अंदाजित करण्यात आले आहे.
  • राज्यातील 7 जिह्यांचे दरडोई उत्पन्न दरडोई राज्य उत्पन्नापेक्षा (रु.95,339) अधिक आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर आणि नागपूर या जिह्यांचा समावेश होतो.
  • राज्यातील 15 जिह्यांचे दरडोई उत्पन्न दरडोई राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा (रु.61,564) कमी आहे. यामध्ये उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, जालना, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, भंडारा, यवतमाळ, नंदुरबार, गोंदिया आणि गडचिरोली या जिह्यांचा समावेश होतो. नंदुरबार वगळता इतर जिल्हे विदर्भ मराठवाड्यातील आहेत.

बालिकांवरील बलात्काराच्या संख्येत वाढ:
  • महिलांवरील अत्याचारा विरोधात 2011 मध्ये न्यायालयात 1.42 लाख प्रकरणे न्यायालयीन चौकशीसाठी दाखल झाली होती. त्यातील 91.8 टक्के प्रकरणे प्रलंबित होती.
  •  महाराष्ट्रात बलात्काराच्या 1,701 तर मुंबईत 221 घटना नोंदविण्यात आल्या. 14 ते 18 वयोगटातील स्त्रियांवरील बलात्कारामध्ये 3.69 टक्के वाढ झालेली आहे.
  • बालकांविरोधात घडलेल्या गुह्यांमध्ये बालकांवरील बलात्कार झालेल्या गुह्यांची संख्या 818 इतकी झाली आहे. मागील वर्षी ही संख्या 747 इतकी होती.
  • राज्यात स्त्री भ्रूणहत्यांचे प्रकरण गाजत असताना गर्भातील जीवाचा खून या गुह्या अंतर्गत 2011 मध्ये केवळ 3 गुह्यांची नोंद करण्यात आली आहे.
  • 2011च्या जनगणनेनुसार 14 जिह्यांत मुलींचे प्रमाण 850 ते 899 दरम्यान आहे. बीडमध्ये ते सर्वात कमी 801 इतके आहे.
  • महिला बाल विकास विभागामार्पत राज्यभरात ग्रामीण, आदिवासी आणि नागरी भागात 553  बालविकास प्रकल्प राबविले जात आहेत.
  •  महाराष्ट्रातील 99 टक्क्यांपेक्षा अधिक गावे बारमाही  हंगामी रस्त्यांनी जोडलेली असली तरी 291 गावे अद्याप कोणत्याही रस्त्याने जोडलेली नाहीत.
   वाहनाच्या संख्येत 9 टक्के वाढ, मात्र रस्त्यांची लांबी तेवढीचः
  •  महाराष्ट्रातील 99 टक्क्यांपेक्षा अधिक गावे बारमाही  हंगामी रस्त्यांनी जोडलेली असली तरी 291 गावे अद्याप कोणत्याही रस्त्याने जोडलेली नाहीत.
  • महाराष्ट्रातील 99 टक्क्यांपेक्षा अधिक गावे बारमाही हंगामी रस्त्यांनी जोडलेली असली तरी 291 गावे अद्याप कोणत्याही रस्त्याने जोडलेली नाहीत.
  • महाराष्ट्रातील रस्त्यांची एकूण लांबी 2.43 लाख किमी एवढी आहे. त्यापैकी 2.23 लाख किमी रस्ते पृष्ठांकित आहेत. 2012मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत रस्त्यांची लांबी 1,207 किमी ने वाढली आहे. तर 2011-12 मध्ये एकाही राज्य महामार्गाची राष्ट्रीय महामार्गात श्रेणीवाढ झालेली नाही.
  • प्रति 100 चौ. किमी क्षेत्रामागे महाराष्ट्रात रस्त्यांची लांबी 133 किमी आहे. केरळमध्ये ती 518 किमी आहे.
  • देशात एकूण लोहमार्गाचे जाळे 65,202 किमी आहे. त्यापैकी 5,984 किमी म्हणजे एकूण लोहमार्ग जाळ्याच्या 9.2 टक्के जाळे महाराष्ट्र राज्यात आहे. वर्षभरात महाराष्ट्राच्या लोहमार्ग जाळ्याच्या लांबीत काहीच वाढ झालेली नाही.
  • 1 जानेवारी, 2013 रोजी दर लाख लोकसंख्येमागे एकूण 208 लाख मोटार वाहने वापरात होती. यात मागील वर्षाच्या तुलनेत 9.9 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  •  राज्यातील एकूण वाहनांपैकी 21.60 लाख वाहने (10.4 टक्के) मुंबई शहरात होती.
  • राज्यात प्रति किलोमीटर रस्त्यामागे 86 वाहने धावत आहेत. मुंबई शहरात (वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे) 2012 मध्ये 24,592 अपघात झाले होते. त्यात 488 जण मृत्यूमुखी तर 4,543 जण जखमी झाले होते.

अधिक माहितीसाठी ब्लॉगवरील पत्त्यावर किंवा दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. अहवाल विनामूल्य उपलब्ध करून दिले जातील.

No comments:

Post a Comment