नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Wednesday, October 13, 2010

Review of Projects under Konkan Irrigation Development Corporation

कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत प्रकल्पांचा आढावा
90 पैकी 77 प्रकल्प अपूर्ण, प्रकल्पांच्या किमतीत 967 टक्के वाढ

कोकणातील पाटबंधारे प्रकल्प ठराविक वेळेत पूर्ण कार्यरत करण्यासाठी आवश्यक संसाधने उभारण्याच्या उद्देशाने 1998मध्ये कोकण पाटबंधारे विकास महमंडळाची स्थापना करण्यात आली. कोकण परिसरातील पाटबंधारे प्रकल्पांच्या त्यांच्या लाभक्षेत्र विकासाच्या योजनांची आखणी करणे, त्यांचे अन्वेषण करणे, संकल्पचित्र काढणे, बांधकाम करणे व्यवस्था पाहणे आणि जल विद्युत ऊर्जा निर्मितीच्या योजना आखणे आदी कार्ये हे महामंडळ पार पाडते. एकूणच कोकणातील पाटबंधारे विकासाची जबाबदारी या महामंडळावर आहे.
मात्र, कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत प्रकल्पांचा आढावा घेता महामंडळ आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचे जाणवते. प्रकल्प पूर्ण करण्यात होणारा विलंब, प्रकल्पांच्या किमतीत झालेली वाढ आदी बाबींचा या अहवालात आढावा घेण्यात आलेला आहे. प्रकल्पांची आकडेवारी दर्शविणारी 4 जोडपत्र सोबत जोडलेली आहेत.
कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत प्रकल्पः
·        कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या स्थापनेपासून आजवर महामंडळांतर्गत एकूण 90 प्रकल्प आहेत.
·        या प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प मोठे असून 11 प्रकल्प मध्यम तर उर्वरित 75 लघु प्रकल्प आहेत.
·        महामंडळांतर्गत प्रकल्प कोकण पाटबंधारे मंडळ (17), उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ (38), दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ (17) ठाणे पाटबंधारे मंडळ (18) असे विभागलेले आहेत.
·        प्रकल्प पूर्ण करण्यातील सर्वाधिक विलंब 31 वर्षांचा आहे.
·        नियोजनाच्या वेळची सर्व प्रकल्पांची मिळून अंदाजीत किंमत एकूण 957 कोटी 44 लाख होती. आजवर या प्रकल्पांवर रु. 4 हजार 209 कोटी 78 लाख खर्च झाले असून सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  आणखी रु. 6 हजार 12 कोटी 76 लाख एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पांची एकूण किंमत रु. 10 हजार 222 कोटी 54 लाख (मूळ किमतीच्या तुलनेत वाढीव किमतीचे प्रमाण 967 टक्के) एवढी वाढली आहे.
पूर्ण झालेले प्रकल्पः
·        90 प्रकल्पांपैकी केवळ 13 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पूर्ण  झालेले सगळे 13 प्रकल्प लघु प्रकल्प असून ते सर्वच्या सर्व वर्ष 2009 मध्ये पूर्ण झालेले आहेत.
·        या 13 प्रकल्पांपैकी 10 प्रकल्प केव्हा पूर्ण करावयाचे होते याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे त्या प्रकल्पांच्या उभारणीत झालेला विलंब सांगता येत नाही.
·        उर्वरित 3 प्रकल्प, (ज्यांचे संदर्भात अशी माहिती उपलब्ध आहे) धसई, पंचनदी आणि पांडेरी अनुक्रमे 31, 26 11 वर्षे विलंबाने पूर्ण झाले. हे तीनही प्रकल्प उत्तर कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत येतात.
·        खोपड या एका प्रकल्पावर प्रत्यक्षात झालेल्या खर्चाची माहिती उपलब्ध झालेली नाही.
·        उर्वरित 11 प्रकल्पांची नियोजनाच्या वेळी एकूण अंदाजित किंमत रु. 24 कोटी 19 लाख होती.
·        प्रत्यक्षात या प्रकल्पांवर एकूण रु. 62 कोटी 51 लाख एवढा खर्च झाला आहे.
·        याचा अर्थ नियोजित किमतीपेक्षा 11 प्रकल्पांचा खर्च रु. 38 कोटी 32 लाखाने अधिक झाला.
·        नियोजित किमतीपेक्षा प्रत्यक्षात अधिक झालेल्या खर्चाचे प्रमाण 158.41 टक्के आहे.
·        दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळांतर्गत येणाऱया 17 पैकी एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
·        पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी धसई प्रकल्प 1978 मध्ये सुरू होऊन त्याच वर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, तो वर्ष 2009 मध्ये 31 वर्षांच्या विलंबाने पूर्ण झाला. प्रकल्पाचा अंदाजीत खर्च रु. 27 लाख होता, प्रत्यक्षात मात्र प्रकल्पावर रु. 5 कोटी 36 लाख (म्हणजे रु. 5 कोटी 9 लाख अधिकचे) खर्च झाले.
·        पांडेरी प्रकल्प 1983 मध्ये सुरू होऊन 1998 मध्ये पूर्ण व्हावयाचा होता. प्रत्यक्षात 2009 मध्ये पूर्ण झालेल्या या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च रु. 69 लाख असताना प्रकल्पावर प्रत्यक्षात रु. 7 कोटी 95 लाख (म्हणजे रु. 7 कोटी 26 लाख अधिकचे) खर्च झाले.
·        1981 मध्ये सुरु झालेला पंचनदी प्रकल्प 1983 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र तो 2009 मध्ये पूर्ण झाला. रु. 3 कोटी 19 लाख अंदाजीत किंमत असणाऱया या प्रकल्पावर प्रत्यक्षात  रु. 4 कोटी 1 लाख एवढा (म्हणजे रु. 82 लाख अधिकचा) खर्च झाला.
मोठे प्रकल्पः
·        कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत भातसा, सुर्या, ताळंबा आणि तिलारी हे 4 मोठे प्रकल्प येतात.
·        1969 ते 1986 या कालावधीत सुरू झालेले हे प्रकल्प 1984 ते 2006 या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, एकही प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण झालेला नाही.
·        1969 मध्ये सुरू झालेला भातसा प्रकल्प केव्हा पूर्ण व्हावयास हवा होता याची माहिती उपलब्ध नाही. आता तो 2015 मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
·        सुर्या प्रकल्प 29 वर्षे विलंबाने 2013 मध्ये, तिलारी प्रकल्प 16 वर्षे विलंबाने 2012 मध्ये आणि ताळंबा प्रकल्प 11 वर्षे विलंबाने 2017 मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
·        या 4 मोठ्या प्रकल्पांची नियोजनावेळी अंदाजीत किंमत रु. 150 कोटी 16 लाख एवढी कमी होती. आजवर या प्रकल्पांवर रु. 1 हजार 541 कोटी 71 लाख खर्च झालेले असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी रु. 2 हजार 408 कोटी 9 लाख एवढ्या निधीची आवश्यकता आहे.
·        झालेला खर्च आवश्यक निधी लक्षात घेता प्रकल्पांवर होणारा वाढीव खर्च रु. 3 हजार 799 कोटी 64 लाख असेल. वाढीव खर्चाचे हे प्रमाण मुळ अंदाजाच्या तुलनेत 2530 टक्के एवढे आहे.
·         तिलारी प्रकल्पाची वाढलेली किंमत रु. 1 हजार 651 कोटी 95 लाख सर्वाधिक आहे.
·        या प्रकल्पावर सर्वात जास्त रु. 798 कोटी 43 लाख एवढा खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी रु. 898 कोटी 72 लाख एवढ्या अधिक निधीची आवश्यकता आहे.
मध्यम प्रकल्पः
·        महामंडळांतर्गत येणाऱया 11 मध्यम प्रकल्पांपैकी एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही.
·        या सर्व प्रकल्पांची मूळ अंदाजीत किंमत रु. 365 कोटी 42 लाख होती.
·        या प्रकल्पांवर आजवर रु. 1 हजार 580 कोटी 15 लाख एवढा निधी खर्च झालेला असून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणखी रु. 2 हजार 186 कोटी 52 लाखांची गरज आहे.
·        मध्यम प्रकल्पांच्या एकूण किमतीत रु. 3 हजार 401 कोटी 25 लाख वाढ झालेली आहे. त्याचे मूळ अंदाजाशी प्रमाण 930 टक्के आहे.
·        मध्यम प्रकल्पांपैकी सर्वाधिक लांबलेला हेटवणे प्रकल्प 1985 मध्ये सुरू होऊन 1991 मध्ये पूर्ण व्हावयास हवा होता. आता तो 2013 मध्ये पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत   रु. 15 कोटी 36 लाख होती. पूर्ण होईपर्यंत प्रकल्पावर अधिकचे रु. 397 कोटी 98 लाख खर्च होतील, असा अंदाज आहे.
·        मध्यम प्रकल्पांपैकी किमतीत सर्वाधिक वाढ झालेला गडनदी प्रकल्प रु. 10 कोटी 37 लाखात 2005 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. आता हा प्रकल्प 2014 मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे. त्यावर अधिकचे रु. 520 कोटी 63 लाख खर्च होतील.

लघु प्रकल्पः
·        कोकण पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणाऱया एकूण 75 लघु प्रकल्पांपैकी 13 प्रकल्प पूर्ण झालेले आहेतः अजून 62 प्रकल्प अपूर्णावस्थेत आहेत.
·        62अपूर्ण प्रकल्पांची मूळ अंदाजीत किंमत रु. 417 कोटी 12 लाख होती. हे सर्व प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पांची किंमत रु. 2 हजार 26 कोटी 6 लाख (485.72 टक्के) एवढी अधिक वाढेल.
·        लघु प्रकल्पांपैकी तळवट प्रकल्प सर्वाधिक 19 वर्षे लांबला असून रु. 64 लाखात पूर्ण करावयाच्या या प्रकल्पाची किंमत प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रु. 22 कोटी होईल.
·        लघु प्रकल्पांपैकी शिरशिंगे हा वर्ष 2000 मध्ये सुरु झालेला प्रकल्प 2002 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आता तो 2012 पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे. रु. 10 कोटी 46 लाखात पूर्ण करावयाचा हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत त्याची किंमत रु. 240 कोटी 11 लाख एवढी वाढेल.
·        कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून प्राप्त माहितीनुसार शिवडाव, मोरवणे आणि शीळ हे प्रकल्प अपूर्ण प्रकल्पांच्या यादीत दाखविले आहेत. मात्र, प्रकल्प पूर्ण होण्याचे अपेक्षित वर्ष प्रत्यक्षात उलटून गेलेले आहे.

वर्ष 2010 मध्ये पूर्ण व्हावयाचे प्रकल्पः
·        वाघ, तुळ्याचापाडा, पन्हाळघर, पाली-भुतवली, भोलवली, पिंपळवाडी, कोंडीवली, तांगर, अवशी, शिरसाडी, रानगाव, साखरपा, दाभाचीवाडी, शिरमंत, रोशनी, वावीहर्ष, वैतरणेश्वर असे 17 लघु प्रकल्प 2010 मध्ये पूर्ण होतील असा अंदाज आहे.
·        नियोजनाच्या वेळी या सर्व प्रकल्पांची एकूण अंदाजित किंमत रु. 62 कोटी 88 लाख होती.
·        31 मार्च 2010 पर्यंत या प्रकल्पांवर एकूण रु. 336 कोटी 39 लाख खर्च झालेले असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून रु. 121 कोटी 44 लाख एवढ्या निधीची आवश्यकता आहे. याचा अर्थ या प्रकल्पांवर अधिकचे रु. 394 कोटी 95 लाख खर्च होणार आहेत.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळास प्राप्त निधी खर्च (रु. कोटीत)
वर्ष
प्राप्त निधी
खर्च
शिल्लक
1998-1999
180.66
81.62
99.04
1999-2000
110.55
91.96
18.59
2000-2001
56.17
163.86
-107.69
2001-2002
203.77
203.11
0.66
2002-2003
192.43
184.09
8.34
2003-2004
295.35
290.6
4.75
2004-2005
182.03
197.71
-15.68
2005-2006
231.25
186.47
44.78
2006-2007
400.49
376.57
23.92
2007-2008
471.37
421.84
49.53
2008-2009
573.74
575.34
-1.6
संदर्भ: कोकण पाटबंधारे विकास महामंडळाकडून माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेली माहिती
जोडपत्र 1: कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मोठे प्रकल्प
जोडपत्र 2: कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे मध्यम प्रकल्प
जोडपत्र 3: कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे पूर्ण झालेले प्रकल्प (सर्व लघु)
जोडपत्र 4: कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे अपूर्ण लघु प्रकल्प

No comments:

Post a Comment