नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Friday, December 9, 2011

खतांचा वापर आणि पिकांची उत्पादकता

खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारे मिश्रण. खतात मुख्य दोन प्रकार असतात. रासायनिक (केमिकल) आणि सेंद्रिय जैविक (ऑरगॅनिक आणि बायो) खत.
रासायनिक खतांचा वाढता वापर - रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे पिकांची उत्पादकता कमी होते जमिनीचीही धूप होते. रासायनिक खतांचा अति असमतोल वापर करून जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्यांचा (मायक्रोन्यूट्रियंट्स) नाश होतो.  सुरुवातीला जरी रासायनिक खते वापरून पिकांची उत्पादकता वाढत असली तरी ते प्रमाण कालांतराने घटत जाते. भारतात हरित क्रांतीच्या आधी सेंद्रिय जैविक खतांचाच वापर होत होता. हरित क्रांतीमुळे संकरित (हायब्रिड) बीज उत्पादन व्हायला लागले या संकरित बीजातून जास्तीत जास्त उत्पादन काढायला रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु झाला.
भारतातील रासायनिक खतांचा वाढता वापर

वर्ष
मेट्रिक टन मध्ये एकूण वापर
किलो प्रति हेक्टर वापर
1970-71
2.18
13.13
1980-81
5.52
31.83
1990-91
12.54
67.49
1991-92
12.73
69.84
1992-93
12.15
65.53
1993-94
12.24
66.69
1994-95
13.56
73.12
1995-96
13.88
74.81
1996-97
14.31
76.70
1997-98
16.19
86.80
1998-99
16.80
89.80
1999-00
18.07
95.60

स्त्रोतः http://www.agricoop.nic.in
सूक्ष्म पोषक द्रव्यांचे घटते प्रमाण - सुरुवातीला फक्त रासायनिक खताच्या रुपात नत्र, स्फुरद आणि पालाश (म्हणजेच अनुक्रमे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम) वापरून उत्पादक क्षमता वाढविण्यात आली. मात्र, जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्ये कमी झाल्याने त्यांची कमतरता भासू लागली. त्यामुळे नत्र, स्फुरद आणि पालाश बरोबर सूक्ष्म पोषक द्रव्यांचाही वापर रासायनिक खतांमध्ये होऊ लागला. त्याचे आता विपरीत परिणाम होऊ लागले आहेत.
रासायनिक खतांमुळे जमीन, माती, पाणी आणि एकंदरित सर्व पर्यावरणाचे अधःपतन होते. रासायनिक खतांमुळे पिकांच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. पिकांचा आकार, दर्जा आणि चवीतही फरक पडतो. रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे शेतकऱयांच्या प्रकृतीवरही त्याचा प्रभाव पडतो. रासायनिक खतांद्वारे पिकवलेल्या अन्नपदार्थांचा विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतो.
पर्यावरणाचे प्रदूषण - रासायनिक खतांसोबत डी.डी.टी. सारख्या रासायनिक औषधांची फवारणीही केली जाते. याचा विपरीत परिणाम शेतकरी आणि पिकांशी संबंधित घटकांवही (मजूर, प्राणी इत्यादी) होतो. रासायनिक खते औषधे मोठ्या प्रमाणात वापरल्यास पाणी जमिनीचे नुकसान करतात.
भारतात रासायनिक किटकनाशकांचा वाढता वापर

वर्ष
वापर (000 टन)
वर्ष
वापर (000 टन)
1970-71
24.32
1995-96
61.26
1980-81
45.00
1996-97
61.26
1990-91
75.00
1997-98
56.11
1991-92
72.13
1998-99
52.44
1992-93
70.79
1999-00
49.16
1993-94
63.65
2000-01
46.20
1994-95
61.36
2001-02
44.58

स्त्रोतः http://www.agricoop.nic.in
रासायनिक खते वापरुनही भारताची पीक उत्पादकता इतर अनेक देशांपेक्षा खूप कमी आहे. रासायनिक खतांचा वापर आणि औषध फवारणी वाढली आहे; पण त्याचा परिणाम पीक उत्पादन क्षमतेवर झालेला दिसून येत नाहीत.
भारतामधील विविध शेती पद्धतीमधील कापसाची उत्पादकता

(किलो प्रति हेक्टर)
वर्ष
पारंपरिक शेती
एकात्मीकृत पीक पद्धत
सेंद्रिय शेती
1993-94
1159
807
464
1994-95
652
740
560
1995-96
651
781
849
1996-97
623
710
898
बदलीचे पीक म्हणून सोयाबीनचे पीक घेतल्याने सेंद्रिय शेतीतील उत्पादकतेत वाढ
1998-99
1199
1961
2769

स्त्रोतः पी. डी. शर्मा, प्रॉस्पेक्टस् ऑफ ऑरगॅनिक फार्मिंग इन इंडिया, 2003
वाढती औषध फवारणी - रासायनिक औषध फवारणीमुळे किटकांची प्रतिरोधक शक्ती (रेझिस्टंस पॉवर) वाढायला लागली आहे. औषध फवारणीमुळे मुख्य पिकांच्या आजुबाजूला असलेले त्यांना उपयोगी असलेले इतर वेली कीटकही मरतात त्यामुळे जैविक विविधताही (बायो डायवरसिटी) धोक्यात आली आहे.
रासायनिक खते तयार करण्यासाठी वापरली जाणारी खनिज इंधन - रासायनिक खते पुनरुज्जीवन होणाऱया नैसर्गिक साधनसंपत्ती (उदा. तेल, नैसर्गिक वायू) पासून बनविली जातात. ही साधनसंपत्ती भारताला आयात करावी लागते. याचे परिणाम राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होतात. एक किलो नत्र असणारे रासायनिक खत बनविण्यासाठी 0.75 किलो नैसर्गिक वायू आणि 0.8 लिटर खनिज तेल लागते. एक लिटर खनिज तेल 2.6 किलो कार्बन डायऑक्साईड प्रदूषण करते.
 इतर तोटे - व्यावसायिक शेती आता रासायनिक खते वापरून व्हायला लागली आहे. अधिक उत्पादन घेण्यामुळे पिकांचा जीन संचय“(gene pool) कमी झाला पिकांची रोगप्रवृत्ती अधिक वाढली. संक्रमित बियाणांतून जास्ती उत्पादकता मिळवण्यासाठी सिंचनाची गरज असते. या बियाणांना पाण्याची कमतरता चालत नाही. त्यामुळे बऱयाच वेळेला पाणी गरजेपेक्षा जास्त प्रमाणात वापरले जाते. यामुळे पाण्याचा अपव्यय होतो अधिक पाणी साचल्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. वाहून जाणारे पाणी इतर पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्याने पाण्याचे ते स्त्रोत प्रदूषित होतात.
शेतकऱयांची वाढती गुंतवणूक - रासायनिक खतांच्या वापराबरोबर औषध फवारणीही करायला लागते. औषधे आणि रासायनिक खतांवरील अर्थसाहाय्य सरकारने कमी केल्यामुळे ती स्वस्त राहिलेली नाहीत. रासायनिक खते आणि औषध फवारणीमुळे शेतकऱयांची गुंतवणूक वाढली आणि काही कारणास्तव पीक असफल ठरल्यास शेतकऱयांचे नुकसान वाढू लागले. यामुळे शेतकऱयाला कर्जावर अधिक अवलंबून राहावे लागत आहे. त्याचे विपरीत परिणाम स्पष्टपणे दिसू लागले आहेत.
सेंद्रिय जैविक खतांचा वापर - योग्य प्रमाणात सेंद्रिय जैविक खतांचा वापर हा यावरील उपाय ठरू शकेल. जैविक खते म्हणजे मूलकल्प (रायझोबियम), ऍझोटोबॅक्टर, नील-हरित शैवाल, इत्यादी. सेंद्रिय खते म्हणजे शेणखत, कचरा खत, शेतीतील शिल्लक कचऱयातून तयार केलेले खत, कडूलिंबाचा पाला इत्यादी. सेंद्रिय जैविक खते वापरायची पद्धत भारतीय शेतीला नवीन आहे, असे म्हणता येणार नाही. फार पूर्वीपासून भारतात शेती हे जगण्याचं महत्वाच साधन होतं आणि शेणखत, कडुलिंबाची पाने, तेल बियांचे पेंड खत म्हणून वापरले जायचे. सेंद्रिय जैविक खते वापरण्याचं पारंपरिक ज्ञान भारतीय शेतकऱयांना आहे. सेंद्रिय जैविक खतांमुळे उत्पादकते सोबतच पिकाच्या आकारात पोषक तत्वात देखील वाढ होते. ही खते वापरुन कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत. ही खते जमिनीला नत्र, स्फुरद, पालाश बरोबर सूक्ष्म पोषक द्रव्येही पुरवतात. भारतात फार कमी प्रमाणात सेंद्रिय जैविक खते वापरली जातात. भारतातील फक्त 0.3 टक्के शेती सेंद्रिय जैविक खतांद्वारे होते, हे प्रमाण जगातल्या इतर देशांपेक्षा खूप कमी आहे.
विविध देशांतील सेंद्रिय जैविक खतांचा वापर
देशाचे नाव
सेंद्रिय जैविक खतांखालील शेती (हेक्टर)
सेंद्रिय जैविक खतांखालील शेतीचे प्रमाण
ऑस्ट्रेलिया
12,294,290
2.8
चीन
2,300,000
0.4
अर्जेंटिना
2,220,489
1.7
अमेरिका
1,620,351
0.5
इटली
1,148,162
9.0
उरुग्वे
930,965
6.1
स्पेन
926,390
3.7
ब्राझिल
880,000
0.3
जर्मनी
825,539
4.8
ब्रिटन
604,571
3.8
कॅनडा
604,404
0.9
फ्रान्स
552,824
2.0
भारत
528,171
0.3
            स्त्रोतः युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन
सेंद्रिय जैविक खते वापरल्याचे फायदे - शेतकरी सेंद्रिय जैविक खतांकडे वळण्याची दोन मुख्य कारणे आहेत, एक म्हणजे बाजारात सेंद्रिय जैविक खते वापरुन तयार केलेल्या शेतीमालाला पारंपरिक शेतीमालापेक्षा जास्ती भाव मिळतो आणि दुसरे निर्यातीच्या दृष्टीकोनातून `जागतिक व्यापार संघटना (WTO)', युरोपीयन देश आणि अमेरिका यांचे असेंद्रिय पिकांवर असलेले निर्बंध.
भारतातून सेंद्रिय जैविक खते वापरून केलेल्या उत्पन्नाची निर्यात (2002)
पदार्थ
परिमाण(टन)
पदार्थ
परिमाण(टन)
चहा
3000
कॉफी
550
तांदूळ
2500
काजू
375
कडधान्य भाजीपाला
1800
कडधान्य
300
कापूस
1200
औषधी वनस्पती
250
गहू
1150
तेलबिया
100
मसाल्याचे पदार्थ
700
एकूण
11925
            स्त्रोतः चहा मंडळ, कॉफी मंडळ, मसाले मंडळ आणि APEDA  यांची संकेतस्थळे.

भारतातही सेंद्रिय जैविक खते वापरुन तयार केलेल्या पदार्थांचा वापर वाढत आहे. मोठ्या शहरांबरोबरच छोट्या गावातही हा बदल जाणवत आहे.
ग्रामीण रोजगार संधी - सेंद्रिय जैविक खते वापरुन केली जाणारी शेती श्रमिक प्रधान असते. जिकडे श्रममूल्य जास्ती आहे, अशा प्रगत देशांमध्ये सेंद्रिय जैविक खते वापरुन शेतीचा उत्पादन खर्च वाढणे परवडण्यासारखे नसले तरी भारतासारख्या देशात, जेथे शेतीवर मोठी लोकसंख्या अवलंबून आहे, अशा प्रकारच्या शेतीचा फायदा होऊ शकतो.

सेंद्रिय जैविक खते वापरण्यास अडथळे - रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय जैविक खते वापरली जाऊ शकतात पण शेतकऱयांना असलेली अपुरी माहिती, अज्ञान आणि खरेदी-विक्रीच्या अव्यवस्थेमुळे सेंद्रिय जैविक खतांचा वापर पाहिजे तितका होत नाही. सेंद्रिय जैविक खते उत्पादन करणारी यंत्रणाही विकसीत झालेली नाही. सेंद्रिय जैविक खतांबद्दल जागरुकता कमी असल्याने सर्वसाधारण शेतकऱयाला सेंद्रिय जैविक खतातला फरक सांगता येत नाही. सेंद्रिय खते खूप जास्ती प्रमाणात लागतात त्यांचे वजनही जास्ती असते. पण जैविक खते एवढ्या जास्ती प्रमाणात लागत नाहीत. शेतकरी बऱयाच वेळेला जैविक खतांबरोबर युरिया ही वापरतात ज्यामुळे जैविक खतांची उत्पादकता कमी होते. सेंद्रिय जैविक खतांचे परिणाम दिसण्यासाठी दीर्घ काळ लागत असल्यामुळे, शेतकरी ते वापरत नाहीत. भारतात सेंद्रिय जैविक खतांचा वापर इक्रीसॅट (ICRISAT)आणि नॅशनल बायो-फर्टिलायझर डेव्हलपमेंट सेंटर (एनबीडीसी)“ सारख्या संस्थांनी प्रमाणित केला आहे. पण भारतात मातीच्या प्रकारात आणि हवामानात खूप विविधता असल्यामुळे सेंद्रिय जैविक खतात एकजिनसिपणा (consistency) येत नाही. देशातल्या एका भागातला अशा खतांचा परिणाम दुसऱया भागात दिसेलच असे नाही. जैविक खते अति-उष्णतेच्या तापमानात टिकत नाहीत. वाहकाचे निर्जंतुकीकरण झाले नसेल तर जैविक खते दूषित होण्याची शक्यता असते. शेतकऱयांना सेंद्रिय जैविक खते वापरुन एकसारखे परिणाम मिळाल्यास खतांच्या वापराबाबत शेतकरी साशंक होतात. जैविक खतांना `भारतीय मानक ब्यूरो (BIS)' चे मानांकन मिळवावे लागत असले तरी याबाबत कोणत्याही प्रमाणपत्राची कार्यपद्धती भारतात नाही. सेंद्रिय जैविक खतांच्या प्रसारास पारंपरिक शेती धोरणामुळे ज्यांचा फायदा होतो अशा गटांचा विरोध असतो.

सेंद्रिय जैविक खते वापरण्यासाठी सरकारने लक्ष घालण्यासाठी आवश्यक असणारे काही मुद्देः
Ø सरकारने सेंद्रिय जैविक खते वापरण्यासाठी अर्थसाहाय्य द्यायला हवे. पूर्वी रासायनिक खतांवर सरकार मोठ्या प्रमाणावर अर्थसाहाय्य पुरवत होतं. अर्थसाहाय्यामुळे सेंद्रिय जैविक खते वापरण्यासाठी शेतकऱयाला उत्तजेन मिळेल आणि सुरुवातीला होणारी उत्पदकतेतील घट बाजारपेठेचा आभाव यापासून शेतकऱयाला सुरक्षा मिळेल. सेंद्रिय जैविक खते वापरणाऱया प्रगत देशांमध्ये शेतकऱयांना अर्थसाहाय्य पुरविले जाते.
Ø सेंद्रिय जैविक खत निर्मितीसाठी स्वयं साहाय्यता गट वा रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीस चालना देता येईल.
Ø सरकारने सेंद्रिय जैविक खते वापरुन पिकवलेल्या वस्तुंच्या फायद्याबद्दल उत्पादक आणि उपभोक्ता दोघांची जागरुकता वाढवली पाहिजे. अशा पिकांसाठी बाजारपेठ तयार केली पाहिजे.
Ø सरकारने मानक प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सक्तीची केली पाहिजे.
Ø ज्या पिकांना सेंद्रिय जैविक खते वापरून सर्वात अधिक फायदा होतो, अशी काही विशिष्ट पिके ओळखून, या पिकांच्या सेंद्रिय जैविक उत्पदनास चालना दिली पाहिजे.
सेंद्रिय जैविक खते वापरून खलील 5 महत्त्वाचे मुद्दे आपण साध्य करू शकतो,
1.   शाश्वत आणि संतुलित शेती (Sustainable and Balanced Agriculture)
2.   वाढीव उत्पादन क्षमता
3.   पर्यावरणाचे संरक्षण
4.   नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन
5.   ग्रामीण विकास





संदर्भः-
1.      “Organic Farming in India: Relevance, Problems & Constraints”, Dr. S. Narayanan, NABARD, 2005
2.      ”Report on Optimization of Fertilizer Usage”, Cabinet Secretariat Committee, Govt. of India
3.      http://fert.nic.in/index.htm (Ministry of Chemicals and Fertilizers, Govt. of India)
4.      http://agricoop.nic.in/ (Department of Agriculture and Cooperation, Govt. of India)
5.      “Production, Procurement and Movement of Fertilizers”, Standing Committee on Chemicals and Fertilizers, Govt. of India, 2007
6.      ”A Review on Organic Farming for Sustainable Agriculture”, Ananata Ghimire, Institute of Agriculture and Animal Science, Rampur, Chitwan, Nepal, 2002

No comments:

Post a Comment