नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Friday, December 9, 2011

विदर्भातील आरोग्य विभागाच्या अनुशेषासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे

1.   जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एकूण उत्पन्नाच्या किमान 5 टक्के रक्कम आरोग्यावर खर्च करणे अपेक्षित आहे. तर 11व्या पंचवार्षिक योजनेनुसार आरोग्य व्यवस्थेवर एकूण उत्पन्नाच्या किमान 4 टक्के रक्कम खर्च करणे अपेक्षित होते. परंतु, सध्या एकूण उत्पन्नाच्या फक्त 1.4 टक्के खर्च आरोग्यावर होत आहे.
2.   विदर्भातील आरोग्य विभागाचा अनुशेष दूर करण्यासाठी राज्यपालांनी 19 मार्च, 2010 मध्ये दिलेल्या निदेशानुसार 1 एप्रिल, 2009 पर्यंत 807 कोटी 51 लाख रुपयांचा अनुशेष शिल्लक होता.
3.   महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी 2011-12 या आर्थिक वर्षासाठी सार्वजननिक आरोग्य सेवेसंदर्भात दिलेले निर्देश 1 एप्रिल, 2000 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा 1353.67 कोटी इतका अनुशेष होता. एप्रिल, 2000 ते मार्च, 2011 या दरम्यान अनुशेष दूर करण्यासाठी 615.30 कोटी इतका खर्च आला. तर 31 मार्च, 2011 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा उर्वरित अनुशेष 738.37 कोटी इतका आहे.
4.   27 मे, 2009 मध्ये दिलेल्या निदेशांच्या परिच्छेद 21 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सार्वजनिक आरोग्य विभागाने 2011-12 पर्यंत आरोग्य संस्थांच्या प्रत्यक्ष पायाभूत सोयी पूर्ण करण्यासाठी योजना तयार केली आहे. ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, रुग्णवाहिका, क्ष-किरण इतर साधनसामग्री आणि फर्निचर याकरिता 2011-12 मध्ये संबंधित विभागाने 195.23 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यातील विदर्भाच्या वाट्याला 28.07 टक्के इतकी रक्कम आली आहे.
5.   मानव विकास कार्यक्रमात राज्यातील 125 मागास तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. यात विदर्भातील एकूण 60 तालुक्यांचा सहभाग होता. या कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अर्धा विदर्भ मागासलेला असल्याची कबुली सरकारने दिली आहे. मानव विकासात गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांचे स्थान सर्वात शेवटचे आहे. तर पुण्यातील एकाही तालुक्याचा मागास तालुक्यांत समावेश नव्हता.


विदर्भातील कार्यरत त्रिस्तरीय आरोग्य संस्थांची संख्या
महाराष्ट्रात एकूण 12 हजार 741आरोग्य संस्था कार्यरत आहेत. त्यातील विदर्भात 3 हजार 593 (3,021 उपकेंद्र, 477 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 95 ग्रामीण रुग्णालये) आरोग्य संस्था कार्यरत आहेत. विदर्भातील आदिवासी भागात 935 आरोग्य केंद्र कार्यरत आहेत.

जिल्हे
उपकेंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्र
ग्रामीण रुग्णालये
लोकसंख्या*
लोक
संख्येत
वाढ %
आदिवासी
बिगर आदिवासी
एकूण
आदिवासी
बिगर आदिवासी
एकूण
आदिवासी
बिगर आदिवासी
एकूण
2001
2011
अकोला
0
178
178
0
30
30
0
5
5
16,29,633
18,18,617
12
वाशिम
0
153
153
0
25
25
0
7
7
10,20,822
11,96,714
17
अमरावती
95
238
333
11
45
56
2
7
9
26,07,160
28,87,826
11
यवतमाळ
118
317
435
19
44
63
4
10
14
24,58,271
27,75,457
13
बुलढाणा
0
280
280
0
52
52
0
12
12
22,32,480
25,88,039
16
नागपूर
26
290
316
4
45
49
1
8
9
40,67,637
46,53,171
14
dवर्धा
0
181
181
0
27
27
0
6
6
12,36,736
12,96,157
5
भंडारा
0
193
193
0
33
33
0
5
5
11,36,146
11,98,810
6
गोंदिया
125
112
237
19
20
39
6
2
8
12,00,707
13,22,331
10
चंद्रपूर
64
275
339
8
50
58
3
8
11
20,71,101
21,94,262
6
गडचिरोली
376
0
376
45
0
45
9
0
9
9,70,294
10,71,795
10
एकूण
804
2217
3021
  106
371
477
25
70
95
2,06,30,987
2,30,03,179
11
स्त्रोत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान संकेतस्थळ. *जनगणना संकेतस्थळ.
2001 च्या जनगणनेनुसार विदर्भातील आरोग्यसंस्थांचा अनुशेष शिल्लक तर होताच पण आता 2011च्या जनगणनेनुसार विदर्भातील लोकसंख्येत 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. विदर्भातील आरोग्य संस्थांची संख्या मात्र dतेवढीच आहे. 2011 च्या जनगणनेनुसार विदर्भात 6402 व्यक्तींमागे एक आरोग्य संस्था उपलब्ध आहे.


भारतीय ग्रामीण आरोग्य व्यवस्था ही उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय अशा तीन प्रकारात विभागलेली आली आहे. या विभागीय आरोग्य संस्थांचे निकष लोकसंख्येवर आधारित आहेत. या निकषांचा आधार घेता विदर्भातील त्रिस्तरीय आरोग्य सेवा पूर्णपणे कोडमडल्याचे दिसून येते.


विदर्भातील उपलब्ध आरोग्य संस्था
2001 च्या जनगणनेनुसार प्रत्येक आरोग्य संस्थेमागे उपचार घेणाऱयांची संख्या
2011 च्या जनगणनेनुसार प्रत्येक आरोग्य संस्थेमागे उपचार घेणाऱयांची संख्या
जिल्हे
उपकेंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्र
ग्रामीण रुग्णालये
उपकेंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्र
ग्रामीण रुग्णालये
उपकेंद्र
प्राथमिक आरोग्य केंद्र
ग्रामीण रुग्णालये
 अकोला
178
30
5
9155
54321
325927
10217
60621
363723
वाशिम
153
25
7
6672
40833
145832
7822
47869
170959
अमरावती
333
56
9
7829
46556
289684
8672
51568
320870
यवतमाळ
435
63
14
5651
39020
175591
6380
44055
198247
बुलढाणा
280
52
12
7973
42932
186040
9243
49770
215670
नागपूर
316
49
9
12872
83013
451960
14725
94963
517019
dवर्धा
181
27
6
6833
45805
206123
7161
48006
216026
भंडारा
193
33
5
5887
34429
227229
6211
36328
239762
गोंदिया
237
39
8
5066
30787
150088
5579
33906
165291
चंद्रपूर
339
58
11
6109
35709
188282
6473
37832
199478
गडचिरोली
376
45
9
2581
21562
107810
2851
23818
119088


·        राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या मानकांनुसार प्रत्येक उपकेंद्रामागे सखल भागात 5 हजार, आदिवासी/डोंगराळ भागात 3 हजार आणि प्रत्येक  प्राथमिक आरोग्य केंद्रामागे सखल भागात 30 हजार, आदिवासी/डोंगराळ भागात 20 हजार जण उपचार घेवू शकतात. तर ग्रामीण रुग्णालयांतर्गत सखल भागात 1 लाख 20 हजार आणि आदिवासी/डोंगराळ भागात 80 हजार जण उपचार घेवू शकतात.
·        विदर्भातील गडचिरोली जिल्हा वगळता सर्व जिह्यातील आरोग्य संस्थांची व्यवस्था वाढत्या लोकसंख्येमुळे कोलमडली आहे.
·        नागपूर जिह्यातील एका उपकेंद्रामागे सध्या सुमारे 14 हजार रुग्ण उपचार घेत आहेत.
·        गडचिरोली जिह्यात फक्त भारतीय आरोग्य संस्थेच्या निकषाप्रमाणे आरोग्य संस्थांची संख्या लोकसंख्येप्रमाणे मर्यादित आहे.


अधिक माहिती साठी आम्हाला संपर्क साधावा

No comments:

Post a Comment