नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Wednesday, March 30, 2011

विभागीय असमतोल


राज्यातील विभागीय असमतोल
राज्याच्या एकूण उत्पन्नात मुंबई, पुणे या विभागांचा सर्वाधिक वाटा आहे.  राज्यातील या विभागांच्या उत्पन्नाच्या चढ-उताराचा आढावा या अहवालात घेण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी पुढे वाचा.
Ø  2004-05 मध्ये राज्य उत्पन्नात (निव्वळ चालु किमतीनुसार) प्राथमिक क्षेत्राचा वाटा 12.9 टक्के, द्वितीयक क्षेत्राचा वाटा 25.9 टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा वाटा 61.2 टक्के होता. 2007-08 मध्ये या क्षेत्रांचा वाटा अनुक्रमे 15.2टक्के, 25टक्के आणि 59.8टक्के असा बदलला.
Ø  एकूण राज्य उत्पन्नामध्ये पुणे आणि मुंबई विभागाचा यांचा वाटा सर्वाधिक आहे. 2004-05 मध्ये तो 45.13 टक्के तर 2007-08 मध्ये तो 43.48 टक्के होता. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे उत्पन्न मिळविल्यास उत्पन्नाचे हे प्रमाण अनुक्रमे 57.20आणि 55.65 टक्के होते.
Ø  नागपूर आणि अमरावती असे दोन्ही विभाग मिळून विदर्भाचा राज्य उत्पन्नातील वाटा 2004-05 2007-08 मधील वाटा अनुक्रमे 15.61 आणि 15.78 टक्के होता.
Ø  नागपूर विभागाचे एकूण उत्पन्न 2004-05 2007-08 मध्ये राज्य उत्पन्नाच्या अनुक्रमे 9.44 आणि 9.45 टक्के होते. त्यापैकी जवळजवळ अर्धे उत्पन्न (4.69आणि 4.54 टक्के) अनुक्रमे नागपूर जिल्ह्यातून मिळालेले होते. तर अर्धे उत्पन्न विभागातील उर्वरित 5 जिह्यांतून मिळाले होते.
Ø  मराठवाडा विभागाचे चित्र 2004-05 च्या मानाने 2007-08 मध्ये किंचितसे आशादायक दिसते. या विभागाच्या उत्पन्नात 9.48 टक्क्यांवरून 10.27 टक्के अशी वाढ झालेली दिसते.
Ø  नाशिक विभागाचे राज्य उत्पन्नाशी प्रमाण 2004-05 2007-08 मध्ये अनुक्रमे 12.86 आणि 13.87 टक्के होते. यामध्ये साधारण 65 टक्के वाटा हा नाशिक अहमदनगर जिह्याचा होता. विभागातील नंदुरबार जिह्याचे उत्पन्न राज्य उत्पन्नाशी तुलना करता 2004-05 मध्ये 0.60 टक्के तर 2007-08 मध्ये 0.91 टक्के असल्याचे दिसते.
Ø  पुणे विभागाचे सरासरी उत्पन्नही राज्याच्या तुलनेत 2004-05 मध्ये 21.65 टक्के 2007-08 मध्ये 22.73 टक्के असले तरी या विभागातील उत्पन्नाच्या अर्ध्याहून अधिक म्हणजे 10.77 टक्के (2004-05), 10.99 टक्के (2007-08) उत्पन्न फक्त पुणे जिल्ह्याचे आहे.
Ø  भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, नंदुरबार आणि सिंधुदूर्ग या 10 जिह्यांचे उत्पन्न 2004-05  2007-08 या दोन्ही वर्षी राज्य उत्पन्नाच्या 1 टक्क्यापेक्षा कमी होते. यापैकी 8 जिल्हे नागपूर औरंगाबाद विभागातील आहेत. गडचिरोलीचे उत्पन्न सर्वात कमी 0.45 टक्के (2004-05) 0.50 टक्के (2007-08) होते.
Ø  परभणी या एकमेव जिह्याचे 2004-05 मधील 0.82 टक्के उत्पन्न 2007-08 पर्यंत 1.02 टक्के एवढे वाढले.
उत्पन्नाचा विभागवार आढावा
नागपूर विभागः
Ø  या विभागातील चंद्रपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांच्या उत्पन्नातील प्राथमिक क्षेत्राचा वाटा 2004-05 ते 2007-08 या काळात वाढला असल्याचे दिसते. गडचिरोली (28.05 वरून 37.91 टक्के), गोंदिया (12.76 वरून 19.87 टक्के), वर्धा (22.92 वरून 28.16 टक्के) या जिल्ह्यांचे प्राथमिक क्षेत्रातील उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे जाणवते. असे असले तरी राज्याच्या प्राथमिक क्षेत्र उत्पन्नातील या विभागाचा वाटा 14.13 टक्क्यांवरून 13.23 टक्के असा कमी झाला आहे.
Ø  द्वितीयक क्षेत्रातील उत्पन्नाचा विचार करता नागपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांची 2004-05 ते 2007-08 या कालावधीत पिछेहाट झाली आहे. गडचिरोलीचे द्वितीयक क्षेत्रातील उत्पन्न 12.53 (2004-05) वरुन 9.98 टक्क्यांपर्यंत (2007-08) घसरलेले दिसते. तर याच कालावधीत गोंदियाचे उत्पन्नही 25.11 वरून 20.63 टक्के एवढे कमी झाले आहे.
Ø  चंद्रपूर वगळता इतर सर्व जिल्ह्यांच्या उत्पन्नातील तृतीयक क्षेत्राचा वाटाही घटला असल्याचे दिसते. आश्चर्यकारकरित्या नागपूरमधील तृतीयक क्षेत्राचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घटले आहे. 2004-05 मध्ये जिल्हा उत्पन्नाच्या 64.12… असणारे हे प्रमाण सुमारे 5 अंशांनी घसरून 2007-08 मध्ये 59.12 टक्के झाले आहे. सर्वाधिक घट गडचिरोलीच्या उत्पन्नात दिसत असून संदर्भीत कालावधीत तेथील तृतीय क्षेत्राचे उत्पन्न 59.42 वरून 52.11 टक्के झाले आहे.
Ø  द्वितीयक तृतीयक  क्षेत्रात चंद्रपूर नागपूर वगळता कोणत्याही जिल्ह्यांचे राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण 1 टक्क्यांपेक्षा जास्त नाही.
अमरावती विभागः
Ø  या विभागाच्या प्राथमिक क्षेत्राचा राज्याच्या प्राथमिक क्षेत्रातील वाटा 9.69 वरून 13.5 टक्के एवढा वाढला आहे. सर्वच जिल्ह्यात प्राथमिक क्षेत्राचे उत्पन्न वेगाने वाढले आहे. वाशिममध्ये जवळपास 24 टक्क्यांनी वाढ दिसते. यवतमाळ आणि अमरावती प्राथमिक क्षेत्र उत्पन्नाच्या दृष्टीने विभागात अग्रभागी आहेत.
Ø  या वाढीला बळ देण्यासाठी या विभागात ऍग्रो प्रोसेसिंग उद्योगांना चालना देणे महत्त्वाचे असताना या विभागाचे द्वितीयक क्षेत्रातील उत्पन्न मात्र संदर्भीत वर्षात राज्याच्या तुलनेत 3.34 वरून 2.96 टक्के असे कमी झाले आहे. द्वितीयक क्षेत्रात कोणत्याच जिल्ह्याचे उत्पन्न राज्याच्या द्वितीयक क्षेत्र उत्पन्नाच्या 1 टक्केही नाही. वाशिममधील द्वितीयक क्षेत्राचा राज्याच्या द्वितीयक क्षेत्रातील वाटा 0.15 टक्के इतका कमी आहे.
Ø  या विभागातील सर्वच जिल्ह्यात तृतीयक क्षेत्र कमालीचे घटले आहे. या विभागाच्या तृतीयक क्षेत्राचा राज्याच्या तृतीयक क्षेत्रातील वाटा 2004-05 ते 2007-08 या कालावधीत 6.62 वरून 5.92 टक्के असा कमी झाला आहे.
औरंगाबाद विभाग
Ø  या विभागातील सर्वच जिल्ह्यातील प्राथमिक क्षेत्राच्या उत्पन्नात 2004-05 ते 2007-08 या काळात वाढ झाल्याचे जाणवते. हिंगोली आणि परभणीमध्ये जिल्हा अंतर्गत उत्पन्नात प्राथमिक क्षेत्राच्या वाढीचा वेग सर्वाधिक असल्याचे दिसून येते. राज्याच्या प्राथमिक क्षेत्र उत्पन्नातील या विभागाचा वाटाही 16.74 वरून 20.73 टक्के असा वाढला आहे.
Ø  औरंगाबाद वगळता सर्व जिल्ह्यांच्या उत्पनातील द्वितीयक क्षेत्र उत्पन्नात घट झाली आहे. या विभागाच्या द्वितीयक क्षेत्र उत्पन्नापैकी 53 टक्के उत्पन्न एकट्या औरंगाबाद जिल्ह्याचे आहे.
Ø  जिल्ह्यांतर्गत उत्पन्नातील द्वितीयक क्षेत्राचा वाटा कमी झाला असला (18.7 वरून 16.97 टक्के) तरी राज्य उत्पन्नाच्या द्वितियक क्षेत्रातील विभागाचा वाटा किंचित वाढला आहे (6.84 ते 6.97 टक्के), असे असले तरी औरंगाबाद वगळता एकाही जिह्याचे द्वितीयक क्षेत्रातील उत्पन्न राज्याच्या द्वितीयक क्षेत्र उत्पन्नाच्या 1 टक्केही नाही.
Ø  2004-05च्या तुलनेत 2007-08 मधील तृतीयक क्षेत्राच्या उत्पन्नात सर्वच जिह्यांचे उत्पन्न घटले आहे. बीडमध्ये ही घट नगण्य आहे; तर परभणी, हिंगोली, जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात घसरण जास्त आहे. राज्याच्या तृतीयक क्षेत्राच्या उत्पन्नातील विभागाचा वाटाही किंचित कमी झालेला आहे.
नाशिक विभाग
Ø  या विभागातील नाशिक जिल्हा वगळात सर्वच जिल्ह्यांच्या उत्पन्नात प्राथमिक क्षेत्राचा वाटा 2004-05 (24.85 टक्के)च्या तुलनेत 2007-08 (26.35 टक्के) मध्ये वाढलेला आहे. नंदुरबारमध्ये ही वाढ सर्वाधिक आहे.
Ø  असे असले तरी नाशिक विभागाच्या प्राथमिक क्षेत्रातील उत्पन्नाचा राज्य प्राथमिक क्षेत्र उत्पन्नातील वाटा 2004-05च्या तुलनेत 2007-08 मध्ये घसरलेला आहे. या घसरणीस नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक क्षेत्राची घसरण कारणीभूत ठरते.
Ø  संदर्भीत वर्षात या विभागाच्या जिह्यांतर्गत उत्पन्नातील द्वितीयक क्षेत्राचा वाटा (20.64 वरून 21.14 टक्के) त्याचप्रमाणे राज्याच्या द्वितीयक क्षेत्र उत्पन्नातीलही विभागाचा वाटा (10.25 वरून 11.72 टक्के) किंचित वाढलेला आहे.
Ø  राज्याच्या द्वितीयक क्षेत्राशी तुलना करता नाशिक, जळगाव अहमदनगरमधील उत्पन्नात वाढ झालेली दिसते. तर धुळे आणि नंदुरबारचे द्वितीयक क्षेत्रातील उत्पन्नाचे प्रमाण राज्याच्या द्वितीयक क्षेत्र उत्पन्नाच्या 1 टक्केही नाही.
Ø  जिल्हा उत्पन्नातील तृतीयक क्षेत्राच्या वाट्यात 2004-05च्या तुलनेत 2007-08मध्ये घसरण झाली असली तरीदेखील राज्य तृतीयक क्षेत्र उत्पन्नातील विभागाचा वाटा किंचीत वाढलेला आहे. विभागाच्या तृतीयक क्षेत्र उत्पन्नापैकी 60टक्क्यांहून अधिक उत्पन्न नाशिक अहमदनगर जिह्यातून आहे.
पुणे विभाग
Ø  या विभागाचा जिह्यांतर्गत उत्पन्नातील प्राथमिक क्षेत्राचा वाटा राज्याच्या प्राथमिक क्षेत्र उत्पन्नातील वाटा 2004-05 च्या तुलनेत 07-08मध्ये कमी झालेला आहे. सोलापूर या एकमेव जिह्याच्या प्राथमिक क्षेत्र उत्पन्नात वाढ झाली आहे.
Ø  जिल्हा अंतर्गत उत्पन्नात सोलापूर वगळता इतर सर्व जिह्यांचा द्वितीयक क्षेत्रातील वाटा 2004-05च्या तुलनेत 2007-08 मध्ये वाढलेला आहे.
Ø  विभागाच्या द्वितीयक क्षेत्रातील उत्पन्नाची राज्याच्या द्वितीयक क्षेत्र उत्पन्नाशी तुलना केली असता या विभागाचे उत्पन्न संदर्भीत वर्षात 21.65 वरून 24.21 टक्के वाढले आहे. मात्र, यापैकी सुमारे 64 टक्के उत्पन्न हे एकट्या पुणे जिह्याचेच आहे.
Ø  राज्याच्या तृतीयक क्षेत्र उत्पन्नातील या विभागाचा वाटा सर्वाधिक आहे. त्यात 2004-05(20.22 टक्के) पेक्षा 2007-08 मध्ये (21.7 टक्के) वाढही झालेली आहे. या विभागाच्या जिल्हा अंतर्गत उत्पन्नापैकी 57 टक्के उत्पन्न तृतीयक क्षेत्रातून येते.
Ø  आश्चर्य म्हणजे पुणे जिह्याच्या तृतीयक क्षेत्र उत्पन्नाच्या प्रमाणात संदर्भीत वर्षात किंचित घट (55.60वरून 54.47 टक्के) झालेली असली तरी कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिह्यांच्या उत्पन्नाचे प्रमाण मात्र वाढलेले दिसते.
कोकण विभाग
Ø  2004-05 2007-08 या दोन्ही वर्षी कोकण विभागाचे राज्याच्या प्राथमिक क्षेत्र उत्पन्नातील प्रमाण इतर विभागांच्या तुलनेत सर्वात कमी होते. या विभागाची प्राथमिक क्षेत्रात झालेली पिछेहाट लक्षणीय आहे. 2004-05 मध्ये राज्याच्या प्राथमिक क्षेत्र उत्पन्नात या विभागाचा वाटा 9.13 टक्के होता. तो 2007-08 पर्यंत 6.45 टक्के एवढा कमी झाला. जिह्यांतर्गत उत्पन्नातील प्राथमिक क्षेत्राचा वाटाही संदर्भीत कालावधीत घटला (6.96 वरून 5.91 टक्के) आहे.
Ø  जिह्यांतर्गत उत्पन्नातील द्वितीयक क्षेत्र उत्पन्नाच्या प्रमाणात राज्याच्या द्वितीयक क्षेत्र उत्पन्नातील विभागाच्या वाट्यात किंचित वाढ झालेली दिसते. विभागाच्या द्वितियक क्षेत्र उत्पन्नातील सुमारे 68 टक्के उत्पन्न ठाणे जिह्यातून येते. रायगड जिह्याचे सर्वाधिक उत्पन्न द्वितीयक क्षेत्रातून येते.
Ø  विभागाच्या जिल्हा अंतर्गत उत्पन्नात तृतीयक क्षेत्राचा वाटा 2004-05 (56.22 टक्के) च्या तुलनेत 2007-08 (62.95टक्के) मध्ये वाढला. राज्याच्या तृतीयक क्षेत्रातील विभागाचा वाटाही वाढलेला दिसतो. 2007-08मध्ये कोकण विभागाचा राज्याच्या तृतीयक क्षेत्रातील वाटा 17.48 टक्के होता. यापैकी 13.74 टक्के उत्पन्न हे केवळ ठाणे जिह्याचे होते.
Ø  रायगड जिल्ह्याच्या तृतीय क्षेत्र उत्पन्नात आश्चर्यकारक वाढ दिसते. मात्र त्यासाठी कोणतेही स्पष्टीकरण उपलब्ध नाही.
Ø  सिंधुदूर्ग जिह्याचा एकूण राज्य उत्पन्नातील त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रांच्या उत्पन्नातील वाटा 2004-05च्या तुलनेत 2007-08मध्ये घटला आहे. या जिह्याचा एकूण राज्य उत्पन्नातील तसेच द्वितीयक तृतीयक क्षेत्रातील वाटा 1 टक्काही नाही.

No comments:

Post a Comment