नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Wednesday, November 24, 2010

School Education System Under Different Boards in Maharashtra

महाराष्ट्रातील विविध शिक्षण मंडळांचा आढावा 
तपशील
एसएससी
सीबीएसई
सीआयएससीई
आयजीसीएसई
आयबी
मंडळाचे पूर्ण नाव
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (केंद्र सरकार पुरस्कृत)
काऊन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टीफिकेट एक्झामिनेशन (खासगी पण केंद्र शासनमान्य)
इंटरनॅशनल जनरल सर्टीफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन
दी इंटरनॅशनल बॅक्लोरेट
अधिकारक्षेत्र
महाराष्ट्र राज्य
एकूण शाळा - 94,274
प्राथमिक - 74,356
माध्यमिक - 15,433
उच्च माध्यमिक- 4,485
भारतात आणि भारताबाहेर 18 देशांत `सीबीएसई'शी संलग्न शाळा.
`आयसीएसई'शी संलग्न शाळांची संख्या भारतात सर्वाधिक आहे. भारताबाहेर इंडोनेशिया, सिंगापूर येथे प्रत्येकी 1 तर युनायटेड अरब इमिरेटमधील दुबई आणि शारजा या शहरांमध्ये 1-1 शाळा आहेत.
जगभरातील 157 देशांत `आयजीसीएसई' संबंधित शाळा आहेत.
संपूर्ण जगभरात `आयबी'च्या शाळा आहेत.
शिक्षणाचे माध्यम
मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी
इंग्रजी किंवा हिंदी
इंग्रजी
इंग्रजी
इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश चायनीज
मंडळाचा मुख्य उद्देश
1.राष्ट्रीय समान शालेय शिक्षणाच्या कार्यक्रमाला राज्यात प्रोत्साहन देणे.
2.एकत्रित अभ्यासक्रमाची पद्धत अवलंबून सर्वांना समान पाठ्यपुस्तके पुरविणे.
3. खालील विभागीय मंडळांशी समन्वय साधणे.
पुणे  (1966),
नागपूर  (1966), औरंगाबाद  (1966), मुंबई  (1985), अमरावती  (1991), कोल्हापूर  (1991), नाशिक  (1993) आणि लातूर  (1997).
1.परीक्षा पद्धतीत नवनवीन योजना राबविणे.
2.10वी आणि 12वीची खुली परीक्षा घेणे.
3.काळानुरूप अभ्यासक्रमात बदल करणे.
4.लेखी परीक्षेसोबत प्रात्यक्षिक, प्रकल्प सादरीकरण, कार्यशाळा आदी गोष्टींवर भर देणे.
5.ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोकरीनिमित्त सतत शहरे बदलावी लागतात. अशा पालकांच्या मुलांचे शिक्षण कोणत्याही अडचणीविना पूर्ण करणे.
6. विद्यार्थ्यांना नोकरी/व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देणारे किंवा नोकरी/व्यवसायात उपयोगी पडणारे शिक्षण देणे.

1. भारतातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी आयसीएसई बांधील आहे.
2. माणूस म्हणून वावरताना सामाजिक भान जागृत ठेवणे.
3.मुलांमध्ये आत्मनिरीक्षणाची भावना निर्माण करणे.
3. शाळेतून घेतल्या जाणाऱया परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची विज्ञान, साहित्य, फाईन आर्टस् या विषयांतील रुची आणि त्यांची एकूणच बौद्धिक क्षमता वाढविण्यावर भर देण्याचा प्रयत्न करणे.
1.जागतिक पातळीवरील अद्ययावत आणि उच्च शिक्षण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे.
2.अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि विकासात्मक निरीक्षणाची वृत्ती निर्माण करणे.
1. भविष्यात जगभरात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चौकस विचारशक्ती, दुसऱयांना सांभाळून घेण्याची भावना निर्माण करणे.
2.जगभरातील कडक शिस्तीच्या आणि कठोर अभ्यासक्रमाच्या पद्धतीला फाटा देत विद्यार्थ्यांना हवीहवीशी वाटणारी अभ्यासप्रणाली विकसित करणे.
चांगलं-वाईट
1.` वाचा आणि लिहा' वर अधिक भर.
2.भरपूर गुण मिळवता येणारे मंडळ
3.राज्यात प्रसिद्ध
4.खाजगी विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात.
1.राष्ट्रीय स्तरावर पसंती
2.अवघड अभ्यासक्रम
3.व्यापक दृष्टीकोन
4.खाजगी विद्यार्थी परीक्षेस बसू शकत नाही.
1.प्रवेशप्रक्रिया केंद्रीत
2.प्रात्यक्षिकांवर भर
3.समकालीन शिक्षण
4.खाजगी विद्यार्थी परीक्षेस बसू शकत नाही.
1.भारत केंद्रीत शिक्षण नाही.
2.आंतरराष्ट्रीय गोष्टींना विशेष महत्त्व.
3.महागडे शिक्षण
1.भारत केंद्रीत शिक्षण नाही.
2.आंतरराष्ट्रीय गोष्टींना विशेष महत्त्व.
3.महागडे शिक्षण


टीप: या अहवालात वर नमूद केलेल्या मुद्यांव्यतीरिक्त या मंडळांची परीक्षा पद्धती, गुणांकन-श्रेणी पद्धत,  मूल्यमापन, उत्तीर्ण होण्यासाठी लागणारी अर्हता, शिकवण्याची पद्धत, शिक्षक प्रशिक्षण,  पाठ्यपुस्तके  व  शैक्षणिक साहित्य आणि संबंधीत  मंडळांच्या  इतर  महत्वपूर्ण  वैशिष्ट्यांचा  तुलनात्मक  अभ्यास  करण्यात आला आहे. अहवालासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास ब्लॉगवर नमूद केलेल्या पत्त्यावर संपर्क करावा.

No comments:

Post a Comment