नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Tuesday, November 30, 2010

Around 6 Lakh Families in Bondage among 70 Lakh BPL Families in Maharashtra

महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील 70 लाखांहून
अधिक कुटुंबांपैकी सुमारे 6 लाख कुटुंबे वेठबिगार
ग्रामीण विकास मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष

ग्रामीण विकास मंत्रालयाने देशभरातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण केले. BPL Census, 2002 अर्थात `दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची जनगणना, 2002' या शीर्षाखाली सदर सर्वेक्षणाची माहिती ग्रामीण विकास मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (http://rural.nic.in) उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची माहिती गंभीर असून सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचे अपयश स्पष्ट करणारी आहे.
दारिद्र्याची खाई
·        महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील एकूण कुटुंबांची संख्या 71,94,228 इतकी आहे.
·        यामध्ये 14,36,604 (19.97 टक्के) कुटुंबे अनुसुचित जमातींची, 14,51,954 (20.18 टक्के) कुटुंबे अनुसुचित जातींची, 10,25,111 (14.25 टक्के) कुटुंबे इतर मागासवर्गीय आणि 11,79,919 (16.40 टक्के) कुटुंबे इतर प्रवर्गातील आहेत.
·        महाराष्ट्रातील एकूण दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांपैकी सर्वात जास्त कुटुंबे नाशिक (5,34,618), जळगाव (5,32,124), ठाणे (4,69,788), अमरावती (4,15,522) आणि बुलडाणा (3,72,818) या जिह्यात आहेत.
·        नांदेड (3,174) आणि सातारा (9,496) या केवळ दोन जिह्यात 10 हजारांपेक्षा कमी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे आहेत.
·        नाशिक विभागात 18,01,350 (25 टक्के) अमरावती विभागात 14,62,705 (20 टक्के) सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे आहेत. (संदर्भ तक्ता क्र. 1)

तुटपुंजे मासिक उत्पन्न
·        महाराष्ट्रातील एकूण 71,94,228 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांपैकी 43,97,307 (61.12 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 500 पेक्षा कमी आहे.
·        22,02,679 (30.62 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 500 ते 1499 आहे.
·        तर केवळ 94,880 (1.32 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 2,500 पेक्षा जास्त आहे.
·        रु. 250 पेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱया कुटुंबांची सर्वाधिक संख्या ठाणे जिह्यात (1,58,524)  आहे.
·त्याचप्रमाणे जळगाव (1,39,742), अहमदनगर (1,13,212) आणि नाशिक (1,07,494) जिह्यातही रु. 250 पेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱया कुटुंबांची संख्या जास्त आहे.
·        वर्धा जिह्यात 88,111 दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे आहेत. या सर्व कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 250 पेक्षा कमी आहे.
·        रु. 250 पेक्षा कमी मासिक उत्पन्न असणाऱया एकूण 17,22,480 कुटुंबांपैकी सर्वात जास्त कुटुंबे नाशिक 4,63,124 (26.88 टक्के) आणि ठाणे विभागात 3,43,682 (20टक्के) आहेत. (संदर्भःतक्ता क्र. 2)
·        दारिद्र्य रेषेखालील एकूण अनुसुचित जाती जमातीतील 28,88,558 कुटुंबांपैकी 19,68,294 (68.14 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 250 ते 1499 दरम्यान आहे.
·        त्याचप्रमाणे अनुसुचित जाती जमातीतील रु. 2500 पेक्षा जास्त मासिक उत्पन्न असणाऱया कुटुंबांची संख्या केवळ 24,597 (0.85 टक्के) आहे.
·        इतर मागासवर्गातील 10,25,111 कुटुंबांपैकी 7,43,064 (72.48 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 250 ते 1499 दरम्यान आहे. (संदर्भ तक्ता क्र.3)
कसायला जमीन नाही
·        महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील एकूण 71,94,228 कुटुंबांपैकी 48,68,992 (67.68 टक्के) कुटुंबांकडे शेत जमीन नाही.
·        शेत जमीन नसलेल्या कुटुंबांची सर्वात जास्त संख्या यवतमाळ 3,05,096 (83.41 टक्के), जळगाव 4,29,622 (80.74 टक्के), धुळे 2,45,684 (73.43 टक्के) आणि अमरावती 3,02,912 (72.89 टक्के) या जिह्यात आहे.
·        शेत जमीन असलेल्या एकूण 23,11,504 कुटुंबांपैकी 21,33,011 (92.28 टक्के) कुटुंबांकडे 1 हेक्टर पेक्षा कमी सिंचित किंवा 2 हेक्टरपर्यंत बिगर सिंचित जमीन आहे.
·        शेत जमीन नसलेल्या एकूण 48,68,992 कुटुंबांपैकी सर्वात जास्त कुटुंबे नाशिक 12,33,812 (25.34 टक्के) आणि अमरावती विभागात 11,10,164 (22.80 टक्के) आहेत. (संदर्भ तक्ता क्र. 4)
·        शेत जमीन नसलेल्या एकूण 48,68,991 कुटुंबांमध्ये अनुसुचित जाती जमातीच्या एकूण 20,48,881 (42.08 टक्के) कुटुंबांचा समावेश आहे.
·        1 हेक्टर पेक्षा कमी सिंचित जमीन किंवा 2 हेक्टरपर्यंत बिगर सिंचित जमीन असलेल्या एकूण 21,33,011 कुटुंबांपैकी 7,68,323 (35 टक्के) कुटुंबे अनुसुचित जाती जमातीची आहेत.
·        त्याचप्रमाणे 1 ते 2.5 हेक्टर सिंचित जमीन असलेल्या एकूण (1,78,493) कुटुंबांमध्ये अनुसुचित जमातीतील कुटुंबांची संख्या (46,966), अनुसुचित जाती (19,644) आणि इतर मागासवर्गीयांच्या (18,457) तुलनेत जास्त आहे. (संदर्भ तक्ता क्र. 5)
·        शेत जमीन नसलेल्या एकूण 48,68,991 कुटुंबांपैकी 31,15,093 (63.97 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 500 पेक्षा कमी आहे. केवळ 43,336 (0.89 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 2,500 पेक्षा जास्त आहे.
·        0.5 हेक्टर पेक्षा कमी सिंचित जमीन असलेल्या एकूण 16,56,446 कुटुंबांपैकी 11,91,871 (71.95 टक्के) कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 250 ते 1,499 दरम्यान आहे.
·        1 हेक्टर त्यापेक्षा कमी सिंचित जमीन असलेल्या 70 टक्के पेक्षा जास्त कुटुंबांचे मासिक उत्पन्न रु. 250 ते 1,499 दरम्यान आहे. (संदर्भ तक्ता क्र. 6)

अन् डोक्यावर छप्पर नाही
·        एकूण दारिद्र्य रेषेखालील 71,94,228 कुटुंबांपैकी 13,14,698 (18.27 टक्के) कुटुंबे बेघर आहेत.
·        त्याचप्रमाणे 38,00,707 (52.83 टक्के) कुटुंबे कच्च्या घरात तर 14,91,458 (20.73 टक्के) कुटुंबे अर्ध्या पक्क्या घरात राहतात.
·        जेमतेम 10 टक्के कुटुंबे पक्क्या घरात राहतात.
·        दारिद्र्य रेषेखालील एकूण 13,14,698 बेघर कुटुंबांपैकी सर्वात जास्त कुटुंबे नाशिक विभागात 4,87,594 (37.08 टक्के) राहतात. (संदर्भ तक्ता क्र. 7)
अंगभर कपड्याचीही वानवा
·        दारिद्र्य रेषेखालील 17,13,435 (23.82 टक्के) कुटुंबांकडे प्रत्येकी 2 कपडेही नाहीत.
·        52,56,074 (73.05 टक्के) कुटुंबांमध्ये साधारणपणे प्रत्येकी 2 ते 6 कपड्यांची उपलब्धता आहे.
·        प्रति व्यक्ती 6 पेक्षा अधिक आणि 10 पेक्षा कमी कपड्यांची उपलब्धता असलेल्या कुटुंबांची संख्या केवळ 2,15,589 (3.05 टक्के) आहे.
·        प्रत्येकी 2 पेक्षाही कमी कपड्यांची उपलब्धता असलेल्या कुटुंबांची संख्या सर्वात जास्त नाशिक, ठाणे, जळगाव आणि अहमदनगर जिह्यात आहे.
·        त्याचप्रमाणे नाशिक विभागातील प्रत्येकी 2 पेक्षा कमी कपड्यांची उपलब्धता असलेल्या कुटुंबांची संख्या 5,16,998 (30.17 टक्के) इतर विभागांच्या तुलनेत जास्त आहे. (संदर्भ तक्ता क्र. 8)

अन्नाची नेहमीच कमतरता
·        दारिद्र्य रेषेखालील 38,65,646 कुटुंबांपैकी वर्षभर पुरेसे अन्न उपलब्ध असलेल्या कुटुंबांची संख्या केवळ 6,77,728 (17.53 टक्के) आहे.
·        वर्षभर एक वेळचेही पुरेसे अन्न उपलब्ध नसलेली 22,90,704 (59.25 टक्के) कुटुंबे आहेत.
·        त्याचप्रमाणे अनुसुचित जमाती जातीतील दारिद्र्य रेषेखालील 15,55,237 कुटुंबांपैकी केवळ 2,42,950 (15 टक्के) कुटुंबांना वर्षभर पुरेसे अन्न उपलब्ध असते. (संदर्भ तक्ता क्र. 9)
अमानुष वेठबिगारी
·        दारिद्र्य रेषेखालील 38,65,646 कुटुंबांपैकी 5,97,379 (15.45 टक्के) कुटुंबे वेठबिगारीत.
·        याशिवाय 6,15,213 (15.91 टक्के) कुटुंबांमधील स्त्रिया आणि मुलेही मोलमजुरी करतात.                 (संदर्भ तक्ता क्र. 10)
·        दारिद्र्य रेषेखालील एकूण 38,65,646 कुटुंबांपैकी 28,41,304 (76.50 टक्के) कुटुंबांचा उदरनिर्वाह सर्वसाधारण मजुरीवर तर 8,43,475 (21.82 टक्के) कुटुंबांचा उदरनिर्वाह शेत मजुरीवर अवलंबून आहे.
·        केवळ 61,289 (1.59 टक्के) कुटुंबांची उपजीविका कारागीरी 56,293 कुटुंबांची (1.46 टक्के) वेतनावर चालते.  (तक्ता क्र. 11 नुसार)
जगण्यासाठी दाही दिशा
·        दारिद्र्य रेषेखालील 38,65,646 कुटुंबांपैकी 19,36,714 (50.10 टक्के) कुटुंबे स्थलांतरीत होत असतात.  
·        स्थलांतरीत होणाऱया कुटुंबांपैकी 17,44,014 (90 टक्के) कुटुंबे रोजगार हंगामी रोजगारासाठी स्थलांतरीत होतात.
·        रोजगाराशिवाय इतर कारणाने स्थलांतरीत होणारी केवळ 55,267 (1.43 टक्के) कुटुंबे आहेत.
·        अनुसुचित जमातीच्या 7,64,465 कुटुंबांपैकी 4,03,085 (52.73 टक्के) कुटुंबे, अनुसुचित जातीच्या 7,90,772 कुटुंबांपैकी 4, 01,816 (50.81 टक्के) कुटुंबे स्थलांतर करतात. (संदर्भ तक्ता क्र. 12)
कर्जाचा बोजा
·        दारिद्र्य रेषेखालील 38,65,646 कुटुंबांपैकी 22,84,158 (59.09 टक्के) कुटुंबे कर्जाचा भार वाहत आहेत.
·        कर्ज घेतलेल्या कुटुंबांपैकी दैनंदिन खर्चाकरिता अनौपचारिक मार्गाने (उदा. सावकार, नातलग किंवा इतर परिचितांकडून) कर्ज घेतलेल्या कुटुंबांची संख्या 13,28,125 (58.15 टक्के) आहे.
·        उत्पादनाकरिता अनौपचारिक मार्गाने कर्ज घेतलेल्यांची संख्या 5,38,659 (23.58 टक्के) आहे.
·        वित्तीय संस्थांकडून (बँका, पतपेढी इत्यादी) कर्ज घेतलेल्यांची संख्या केवळ 2,66,442 (11.66 टक्के) असून अनौपचारिक मार्गाने कर्ज घेतलेल्यांची संख्या 20,17,716 (88.33 टक्के) आहे.                 (संदर्भ तक्ता क्र. 13)
·
  टीपः-  तक्ता क्रमांक 1 ते 8 महाराष्ट्रातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या एकूण संख्येवर (71,94,228) आधारित आहे. तर तक्ता क्रमांक 9 ते 13 त्यापैकी 38,65,646 कुटुंबांच्या माहितीवर आधारित आहेत.
                                                                                                                                                                                                                                                                                                                          

No comments:

Post a Comment