नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Tuesday, November 30, 2010

Increase in Urbanization Leading to Increasing Poverty

बकाल शहरे
वाढते शहरीकरण, शहरातील वाढती लोकसंख्या, शहरातील गरिबी, विषमता आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्यांनी महाराष्ट्राला वा भारतालाच नव्हे तर जगभरातील देशांना ग्रासले आहे. 10 लाखाच्यावर लोकसंख्या असलेली 26 शहरे आहेत. यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पिंपरी-चिंचवड या 7 शहरांचा समावेश आहे. एकूण लोकसंख्या आणि झोपडपट्टीत राहणाऱयांची संख्या या निकषांवर देशात मुंबई शहराचा पहिला क्रमांक आहे.
भारतात 10 लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या देशातील 26 शहरांची एकूण लोकसंख्या 7 कोटी 8 लाख 13 हजार 900 असून त्यापैकी सुमारे 1 कोटी 65 लाख 65 हजार 459 लोक (23.39 टक्के) झोपडपट्टीत राहणारे आहेत. तर संपूर्ण देशातील झोपडपट्टीवासियांची संख्या 4 कोटी 25 लाख 78 हजार 150 (4.14 टक्के) एवढी आहे.
देशातील महाराष्ट्रातील प्रमुख शहरांची एकूण लोकसंख्या झोपडपट्टीत राहणाऱयांची संख्या
शहर
एकूण लोकसंख्या
झोपडपट्टीत राहणारे
टक्केवारी
दिल्ली
98,17,439
18,54,685
19
कोलकाता
45,80,544
14,90,811
32.5
चेन्नई
42,16,268
7,47,936
18
हैदराबाद
34,49,878
6,01,336
17
मिरत
10,74,229
4,71,316
43
मुंबई
1,19,14,398
58,23,510
49
पुणे
2,540,069
531,337
20
नागपूर
20,51,320
7,26,664
35
ठाणे
12,62,551
4,20,276
28
कल्याण-डोंबिवली
1,193,266
34,854
03
नाशिक
1,076,967
142,234
12
पिंपरी-चिंचवड
1,006,417
129,357
12
अचलपूर
1,07,316
66,790
62
बीड
1,38,196
74,283
54
मालेगाव
4,09,403
2,08,202
51
अमरावती
5,49,510
2,33,712
43
अकोला
4,00,520
1,34,812
34
परभणी
2,59,329
77,798
30
नवी मुंबई
7,04,002
1,39,009
20
स्त्रोत भारतीय जनगणना 2001, संदर्भ राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, कार्यक्रम अंमलबजावणी आराखडा 2009-10
Ø जगभरात चीननंतर (53,59,58,000) भारताचा (31,28,87,000) शहरी लोकसंख्येच्या आकडेवारीत दुसरा क्रमांक लागतो (वर्ष 2005साठीच्या अंदाजानुसार)
Ø गेल्या 15 वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. मागील 4 जणगणनांची आकडेवारीच हे स्पष्ट करते. युनोच्या अहवालानुसार भारतात 2050 पर्यंत 55% लोक शहरात राहतील.

जणगणना वर्ष
शहरीकरणाची टक्केवारी
1971
18%
1981
23%
1991
25%
2001
28%


Ø शहरी लोकसंख्येचे 1901 मधील 10.8 टक्के प्रमाण 2001मध्ये 27.8 टक्के एवढे वाढले आहे.
Ø 1981 ते 2001 या कालावधीत शहरांची लोकसंख्या तिपटीने वाढली आहे. यामुळे जागतिक स्तरावरील पहिल्या 20 मोठ्या शहरी संकुलांमध्ये दिल्ली 5व्या, मुंबई 6व्या आणि कोलकाता 13व्या क्रमांकावर आहे.
Ø स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनच ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरातील लोकसंख्या अधिक गतीने वाढत आली आहे. 1941-51 या दशकात ग्रामीण लोकसंख्येमध्ये 8.8 टक्के तर शहरी लोकसंख्येत 41.4 टक्के वाढ झाली होती.
Ø 1951 मध्ये 6 कोटी 24 लाख तर 2001 मध्ये 28 कोटी 53 लाख लोक शहरांमध्ये राहत होते. 2001च्या जनगणनेनुसार भारतातील 27.8 टक्के लोक शहरांमध्ये राहतात.
Ø 1991 ते 2001 या दशवर्षात ग्रामीण लोकसंख्येत 11,37,98,963 (18.10 टक्के) एवढी वाढ झाली आहे. तर त्याच काळात शहरी लोकसंख्येत 6,85,08,677 (31.48टक्के) एवढी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील वाढते शहरीकरण आणि वाढती गरिबी
Ø नागरी लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्राचा (4 कोटी 10 लाख 19 हजार 734) देशात पहिला क्रमांक लागतो. 2009 पर्यंत नागरी लोकसंख्येत वाढ होऊन ती अंदाजे 4 कोटी 80 लाख एवढी वाढली.
Ø महाराष्ट्रातील 42 टक्के लोकसंख्या शहरात राहणारी आहे. संपूर्ण देशातील नागरी लोकसंख्येपैकी 14 टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे.
Ø 1999 ते 2001 या दशवर्षात महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येत 73,83,000(15.2टवके) एवढी वाढ इााली. तर त्याच काळात शहरी लोकसंख्येत मात्र 1,05,59,000(34.3 टवके) एवढी वाढ झाली आहे.
Ø 2001च्या जनगणनेनुसार राज्यातील शहरात राहणाऱया लोकसंख्येपैकी 1 कोटी 6 लाख (26टक्के) लोक झोपडपट्टीत राहतात.
Ø राज्यातील 80 टक्के शहरी लोकसंख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 40 शहरांमध्ये रहात आहे. तर उर्वरित 20 टक्के शहरी लोक 338 नगरांमध्ये रहात आहेत.
Ø वाढत्या शहरीकरणाबरोबर शहरातील गरिबांची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरात 32[1] टक्के गरीब आहेत, तर राज्यातील एकूण गरिबांची लोकसंख्या  30.7 टक्के आहे.
Ø महाराष्ट्रातील शहरी गरिबांची लोकसंख्या 1 कोटी 31 लाख, 26 हजार 314 (एकूण शहरी लोकसंख्येच्या 32 टक्के)[2] आहे. हे प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत खुपच अधिक आहे.


प्रमुख शहरांतील परिस्थिती
Ø अमरावती जिह्यातील अचलपूर शहराच्या एकूण लोकसंख्येपैकी 62 टक्के लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. हे प्रमाण मुंबई शहरापेक्षाही अधिक आहे.
Ø अमरावती शहरातीलही एकूण लोकसंख्येपैकी 43 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात.
Ø मुंबई शहराची लोकसंख्या 1 कोटी 19 लाख 14 हजार 398 असून यापैकी 58 लाख 23 हजार 510 लोक (एकूण लोकसंख्येपैकी 49 टक्के) झोपडपट्टीत राहतात.
Ø मुंबई शहरावरील वाढता बोजा कमी करण्यासाठी नियोजनबद्ध अशा नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. मात्र, या 21व्या शतकातील शहरातही 20 टक्के लोक झोपडपट्टीत रहात आहेत.
Ø बीड शहराची लोकसंख्या 1 लाख 38 हजार 196 असून यापैकी 74 हजार 283 लोक (54 टक्के) झोपडपट्टीत राहतात.
Ø नाशिक जिह्यातील मालेगाव शहरातील एकूण लोकसंख्येपैकी 51 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात.
Ø मुंबई शहराजवळील नालासोपारा, विरार, नवघर-माणिकपूर या शहरांतील अनुक्रमे 63.3 टक्के, 51.5 टक्के आणि 64 टक्के लोक झोपडपट्यांमधून राहतात.


1 केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्रालय -2007
२  केंद्रीय सामाजिक कल्याण मंत्रालय -2007

No comments:

Post a Comment