नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Friday, December 3, 2010

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ
341 बांधकामाधीन प्रकल्पांच्या किमतीत `37570.6 कोटी वाढ
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत एक हजाराहून अधिक पाटबंधारे प्रकल्प येतात. त्यापैकी 737 प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. एकूण 341 प्रकल्प बांधकामाधीन असून  31 मार्च, 2010 अखेरपर्यंत त्याच्यावर `15157.19 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्पांची उर्वरित किंमत `33051.66 कोटी आहे.

मोठे प्रकल्प
·        विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत 18 मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत.
·    निम्न वणा प्रकल्पाचे काम 1980 मध्ये सुरू झाले होते. ते 1990 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार 22 वर्षांच्या विलंबाने या प्रकल्पाचे काम 2012 मध्ये पूर्ण होईल.
·    या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `24.83 कोटी होती. या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `299.50 कोटी खर्च झाला आहे. अजून `25.05 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रकल्पाच्या वाढीव किमतीत (`299.72 कोटी) मूळ  किमतीच्या तुलनेत 1207.09 टक्के वाढ झाली आहे.
·    उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 1978 मध्ये सुरू झालेले काम 2014 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
·    या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `13.04 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत या प्रकल्पावर `997.72 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `378.61 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `1363.29कोटीने वाढली आहे. तिचे मूळ  किमतीशी प्रमाण 10454.68 टक्के एवढे वाढले आहे.
·    वान प्रकल्पाचे काम 1981 मध्ये सुरू होऊन 1992 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार आता ते  19 वर्षांच्या विलंबाने 2011 मध्ये पूर्ण होईल.
·    `13.37 कोटी मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `250.28 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `26.04 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `262.95 कोटीने वाढली असून मूळ किमतीच्या तुलनेत त्यात 1966.72 टक्के वाढ झाली आहे.
·    1980 मध्ये सुरू झालेला अरुणावती प्रकल्प 1989 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. 22 वर्षांच्या विलंबाने तो 2011मध्ये पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
·    या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `19.14 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `249.74 कोटी खर्च झाला असून अद्याप `84.44 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `312.04 कोटीने वाढली असून ही वाढ मूळ किमतीच्या 1630.30 टक्के आहे.
·    पेनटाकळी प्रकल्पाचे काम 1989 मध्ये सुरू होऊन 1997 मध्ये पूर्ण व्हावयास हवे होते. सुधारित अंदाजानुसार 14 वर्षांच्या विलंबाने ते 2011 मध्ये पूर्ण होईल. 
·    `16.85 कोटी मूळ किंमत असलेल्या या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `187.14 कोटी खर्च झाला आहे. अजून `43.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `213.42 कोटीने वाढली असून मूळ किमतीच्या ती 1266.59 टक्के आहे.
·    बेंबळा प्रकल्पाचे काम 1993 मध्ये सुरू झाले. 2008 मध्ये पूर्ण व्हावयाचे प्रकल्पाचे काम 5 वर्षाच्या विलंबाने 2013 मध्ये पूर्ण होईल.
·    या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `190.36 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `1210.72 कोटी खर्च होऊनही अद्याप `965.56 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `1895.92 कोटीने वाढली असून ही वाढ 1043.24 टक्के आहे.
·    गोसीखुर्द प्रकल्पाचे काम 1983 मध्ये सुरू झाले. ते  1987 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार 27 वर्षे विलंबाने ते 2014मध्ये पूर्ण होईल.
·    या प्रकल्पाची मूळ किंमत `372.22 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत प्रकल्पावर `4176.66 कोटी खर्च झाला असून `3601.19 कोटी एवढ्या निधीची अजूनही आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत `7405.63 कोटी, ही मूळ किमतीच्या 1989.58 टक्के आहे.
·    बावनथडी प्रकल्पाला 35 वर्षांचा विलंब झाला असून 1974 मध्ये सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम 1979 ऐवजी 2014 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
·    या प्रकल्पाची मूळ किंमत `23.47 कोटी होती. प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `511.48 कोटी खर्च झाला असून `43.63 कोटी एवढ्या निधीची अजून आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत `531.64 कोटी झाली आहे. मूळ किमतीच्या तुलनेत ही वाढ 2265.19 टक्के आहे.
·    निम्न वर्धा प्रकल्पाचे काम 1981 मध्ये सुरू होऊन 1994 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार ते 22 वर्षांच्या विलंबाने 2015 मध्ये पूर्ण होईल.
·    या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `48.08 कोटी होती. प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `787.18 कोटी खर्च झाला आहे; अजून `1569.39 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढलेली किंमत `2308.49 कोटी, मूळ किमतीच्या 4801.35 टक्के आहे.
·    धपेवाडा .सिं.यो. टप्पा क्र.2 या प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू झाले असून ते  2021 मध्ये पूर्ण होईल. या प्रकल्पाची मूळ किंमत `917.02 कोटी असून मार्च 2010 पर्यंत `8.94 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्पासाठी अजून `1340.13 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची किंमत `432.05 कोटीने वाढली आहे. मूळ किमतीच्या तुलनेत ही वाढ 47.11 टक्के आहे.
·    1994 मध्ये सुरू झालेल्या खडकपूर्णा प्रकल्पाचे काम 2000 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना आता ते 13 वर्षांच्या विलंबाने 2013 मध्ये पूर्ण होईल.
·    या प्रकल्पाची मूळ किंमत ` 79.55 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `595.33 कोटी खर्च झाला असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `500.59 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत (`1016.37 कोटी), मूळ किमतीच्या 1277.65 टक्के आहे.
·    निम्न पेढी प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू होऊन 2011 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. सुधारित अंदाजानुसार ते 2014 मध्ये पूर्ण होईल.
·    या प्रकल्पाची मूळ किंमत `161.17 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `111.62 कोटी खर्च झाला आहे. अद्याप `430.56 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. `381.01 कोटीने प्रकल्पाची किंमत वाढली असून ही वाढ 236.40 टक्के आहे.
·    तुलतुली प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `19.16 कोटी असून या प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `6.21 कोटी खर्च झाला आहे. सुधारीत अंदाजानुसार प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `852.74 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत `839.79 कोटी, मूळ किमतीच्या 4383.04 टक्के आहे.
·    हुमन प्रकल्प 2019 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असून या प्रकल्पाची मूळ किंमत `33.68 कोटी होती. प्रकल्पावर मार्च 2010 पर्यंत `31.79 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अद्याप `984.69 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. म्हणजेच प्रकल्पाची किंमत `982.80 कोटीने वाढली आहे. ती मूळ किमतीच्या 2918.05 टक्के आहे.
·    निम्न पैनगंगा प्रकल्पाचे काम 2009 मध्ये पूर्ण होईल असे प्रारंभी सांगण्यात आले होते. सुधारित अंदाजानुसार ते 11 वर्षांच्या विलंबाने 2020 मध्ये पूर्ण होईल.
·    या प्रकल्पाची मूळ किंमत `1402.42 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत `131.49 कोटी खर्च झाला आहे. प्रकल्प पूर्णत्वास जाण्यासाठी `10297.90 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाची वाढीव किंमत `9026.97 कोटी, ही मूळ किमतीच्या 643.67 टक्के आहे.
·    जिगाव प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरू झाले, 2013 मध्ये पूर्ण व्हावयाचे प्रकल्पाचे काम 2015 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे.
·    या प्रकल्पाची नियोजनाच्या वेळेची किंमत `698.50 कोटी होती. प्रकल्पाची अद्ययावत किंमत `4044.13 कोटी असून त्यापैकी `508 कोटी मार्च 2010 पर्यंत खर्च झाले आहेत. अजून `3536.14 कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे. प्रकल्पाच्या किमतीत `3345.64 कोटी वाढ झाली आहे. ती मूळ किमतीच्या 478.97 टक्के आहे.
मध्यम प्रकल्प
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळांतर्गत 60 मध्यम प्रकल्पांची कामे बांधकामाधीन आहेत. त्यापैकी 16 प्रकल्प सुरूच झालेले नाहीत. यापैकी 4 प्रकल्प वन जमीनीच्या कारणास्तव सुरू झालेले नाहीत. उर्वरित प्रकल्प 2010 ते 2016 या कालावधीत पूर्ण होणार आहेत.
·    सपन प्रकल्प 2010 मध्ये पूर्ण होणार आहे. या प्रकल्पाची नियोजित किंमत `29.29 कोटी होती. या प्रकल्पावर 31 मार्च, 2010 पर्यंत `312.32 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `51.69 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पाची एकूण वाढीव किंमत `334.72 कोटी आहे ती मूळ किमतीच्या 1142.78 टक्के आहे. हा प्रकल्प 5 वर्षे विलंबाने पूर्ण होणार आहे.
·    सोंडयाटोला .सिं.यो., मदन, कटंगी, धापेवाडा .सिं.यो., उतावळी, सत्रापूर .सिं.यो., उमरझरी हे 7 प्रकल्प 2011 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `97.49 कोटी आहे. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `452.42 कोटी खर्च झालेला आहे. तरीही प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `153.12 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची एकूण वाढीव किंमत `508.05 कोटी आहे. प्रकल्प किमतीतील सरासरी वाढ मूळ किमतीच्या 1405.47 टक्के आहे. सदर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सरासरी 10 वर्षांचा विलंब झाला आहे.
·    चंद्रभागा, जाम, कार, डोंगरगांव, पोथरा, करजखेडा .सिं.यो., वाघोलीबुटी .सिं.यो., सोनपुर टोमटा .सिं.यो., कालपाथरी, तेढवा शिवनी (बिरसोला) .सिं.यो., नवरगाव, अदान हे 11 प्रकल्प 2012 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांची नियोजित किंमत `123.30 कोटी होती. मार्च 2010 पर्यंत या प्रकल्पांवर `905.31 कोटी खर्च झालेला आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `357.25 कोटीचा निधी आवश्यक आहे. प्रकल्पांच्या एकूण किमतीत `1139.23 कोटी वाढ झाली आहे. ती मूळ किमतीच्या 2148.88टक्के आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सरासरी 20 वर्षांचा विलंब झाला आहे.
·    पूर्णा, निम्न चुलबंद .सिं.यो., झाशीनगर उपसा, रजेगावकाटी उपसा, कन्हान नदी प्रकल्प (कोची बॅरेज), चिचघाट उपसा हे 6 प्रकल्प 2013 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्प सुरू झालेले नाहीत. या 6 प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `433.90 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `328.76 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `485.50 कोटी  निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किंमत `380.36 कोटीने वाढली आहे. ही वाढ नियोजित किमतीच्या 226.69 टक्के आहे. सदर प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सरासरी 4 वर्षांचा विलंब होणार आहे.
·    बेंडारा, बोरघाट उपसा, पळसगांवआमडी .सिं.यो., सुरेवाडा उपसा, चिचडोह बॅरेज, बोर्डी नाला, वासनी (बु), पेढी बॅरेज .सिं.यो., उंबर्डा बाजार .सि.यो., पंढरी या 10 प्रकल्पांचे काम 2014 मध्ये पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्पांचे काम सुरू झालेले नाही.  या 10 प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `894.18 कोटी आहे. 31 मार्च, 2010 पर्यंत `681.32 कोटी निधी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `1255.12 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांच्या किमतीत एकूण `1043.26 कोटी वाढ झाली आहे. ती नियोजित किमतीच्या 224.96 टक्के आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये सरासरी 3 वर्षांचा विलंब होणार आहे.
·    लालनाला, हल्दी पुरानी .सिं.यो., डोंगरगांव ठाणेगांव उपसा, काटेपूर्णा बॅरेज, उमा बॅरेज, पुर्णा बॅरेज क्र.2 .सिं.यो. (नेरधामणा), टाकळी डोलारी, वर्धा बॅरेज .सिं.यो., घुंगशी बॅरेज हे 9 प्रकल्प 2015 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांपैकी 2 प्रकल्पांचे काम सुरू झालेले नाही. सर्व  प्रकल्पांची एकूण मूळ किंमत `800.82 कोटी होती. 31 मार्च, 2010 पर्यंत `262.28 कोटी खर्च झालेले आहेत. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अद्याप `780.84 कोटी एवढा निधी आवश्यक आहे. सर्व प्रकल्पांची मिळून किंमत `242.50 कोटीने वाढली आहे. ही वाढ मूळ किमतीच्या 319.35 टक्के आहे. सदर प्रकल्प पूर्ण होण्यामध्ये सरासरी 4 वर्षांचा विलंब झालेला आहे.
·    2016 मध्ये पूर्ण व्हावयाच्या सातही प्रकल्पांचे काम सुरू झालेले नाही. या प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `834.34 कोटी आहे.
·    5 प्रकल्पांच्या बाबतीत `प्रकल्प पूर्ण होण्याचे वर्ष' 2003, 2005, 2007 आणि 2008 असे दर्शविले असले तरी त्यांचा समावेश अपूर्ण प्रकल्पांच्या यादीत केलेला आहे.


लघु प्रकल्प
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडाळांतर्गत 259 लघु प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी 63 प्रकल्पांची कामे सुरूच झालेली नाहीत. त्यातील 24 प्रकल्प वन जमीनीच्या कारणास्तव सुरू झालेले नाही. उर्वरित 196 प्रकल्प 2010 ते 2016 या कालावधीत पूर्ण होणार आहेत.
·    3 प्रकल्प 2010 मध्ये पूर्ण होणार आहेत. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `2.17 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `4.95 कोटी खर्च झालेला आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `0.51 कोटी निधी आवश्यक आहे.  प्रकल्प किमतीतील वाढ `3.29 कोटी असून त्यात नियोजित किमतीच्या सरासरी 208.84 टक्के वाढ आहे.
·    सरासरी 9 वर्षांच्या विलंबाने एकूण 57 प्रकल्प 2011 मध्ये पूर्ण होणार असून त्यांची मूळ किंमत एकूण `237.85 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत किमान `755.16 कोटी खर्च झाला असून ते पूर्ण करण्यासाठी `184.41 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किंमत `701.72 कोटीने वाढली असून ती मूळ किमतीच्या 691.41 टक्के आहे.
·    सरासरी 3 वर्षाच्या विलंबाने तब्बल 77 प्रकल्प 2012 मध्ये पूर्ण होतील असा अंदाज आहे. या 77 प्रकल्पांपैकी 5 प्रकल्प सुरू झालेले नाहीत. या प्रकल्पांची नियोजित किंमत एकूण `923.88 कोटी होती. या प्रकल्पांवर 31 मार्च, 2010 पर्यंत `1014.32 कोटी खर्च झालेला आहे. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अजून `1022.85 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किमतीतील एकूण वाढ `1113.29 कोटी आहे. मूळ किमतीच्या तुलनेत ही वाढ 246.98 टक्के आहे.
·    63 प्रकल्प 2013 मध्ये पूर्ण होणार असून त्यापैकी 19 प्रकल्पांचे काम सुरूच झालेले नाही. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `1063.49 कोटी होती. 31 मार्च, 2010 पर्यंत `81.36 कोटी खर्च झालेला असून प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `1570.65 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांची किंमत `568.52 कोटीने वाढली असून ती मूळ किमतीच्या 109.04 टक्के आहे.
·    सरासरी 4 वर्षांच्या विलंबाने 30 प्रकल्प 2014 मध्ये पूर्ण होणार आहेत. त्यापैकी निम्म्या प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. या प्रकल्पांची मूळ किंमत एकूण `587.72 कोटी होती. 31 मार्च, 2010 पर्यंत `52.11 कोटी खर्च झालेला आहे. हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `646.37 कोटी निधी आवश्यक आहे. प्रकल्पांच्या किमतीत `110.76 कोटी एवढी एकूण वाढ झालेली आहे. मूळ किमतीच्या तुलनेत वाढीव किमतीचे प्रमाण 340.90 टक्के आहे.
·    सर्व 259 लघु प्रकल्पांची मूळ किंमत `2933.86 कोटी होती. मार्च, 2010 पर्यंत प्रत्यक्षात `2017.58 कोटी खर्च झाले आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी `3851.52 कोटी निधीची आवश्यकता आहे. सर्व लघु प्रकल्प मिळून किमतीत झालेली वाढ `2935.24 कोटी आहे.

No comments:

Post a Comment