नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Monday, June 16, 2014

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१३-१४

लोकसंख्या :

  • 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी आहे. 2001 च्या जनगणनेनंतर लोकसंख्येत 1.55 कोटींची भर पडली आहे.

  • निवासी घरांची संख्या 2.37 कोटी आहे.

  • लिंग गुणोत्तर म्हणजे दर हजार पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 929 आहे. राष्ट्रीय स्तरावर हेच प्रमाण 943 आहे.

  • 0 ते 6 वयोगटाच्या बालकांमधील लिंग गुणोत्तर 894 एवढे कमी असून राष्ट्रीय स्तरावर ते 919 असे आहे.

  • एकूण साक्षरतेचे प्रमाण 82 असले तरी महिलांमधील साक्षरतेचे प्रमाण 76 आहे.

  • लोकसंख्येची घनता 365 (व्यक्ती/प्रति चौ.किमी) असून कोकण विभागात ती सर्वाधिक 931 आहे.

  • अनुसूचित जातींचे लोकसंख्येतील प्रमाण 11.8 टक्के असून 2001च्या जनगणनेनुसार ते 10.2 टक्के होते.

  • अनुसूचित जमातींचे लोकसंख्येतील प्रमाण 9.4 टक्के असून 2001च्या जनगणनेनुसार ते 8.1 टक्के होते.

  • राज्यातील 50 टक्के लोकसंख्या 27 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाची आहे.

  • राज्यातील शारीरिक मानसिक अपंग (निःशक्त) व्यक्तींची संख्या 30 लाख (2.6 टक्के) आहे.

  •  देशातील झोडपट्ट्यांमध्ये राहणाऱया लोकसंख्येपैकी सर्वाधिक 18 टक्के लोक राज्यात राहतात. राज्यातील 1.18 कोटी लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.शहरी भागातील 23.3 टक्के लोक झोपडपट्टीत राहतात.

 राज्य अर्थव्यवस्था:
  • स्थिर किमतीनुसार 2011-12 मधील स्थूल राज्य उत्पन्नात  (रू. 7,77,791 कोटी) 6.2 टक्के वाढ होऊन ते 2012-13मध्ये रू. 8,25,832 कोटी इतके वाढले. 2013-14 या वर्षासाठी हा वाढीचा दर 8.7 टक्के असेल स्थूल राज्य उत्पन्न  रू. 8,97,786 कोटींवर पोहोचेल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
  • सुधारित अंदाजानुसार 2012-13 या वर्षी उत्पन्न वाढीचे क्षेत्रनिहाय दर कृषी संलग्न कार्य (-1.0 टक्के), उद्योग (2.7 टक्के) सेवा (8.8) असे होते. 2013-14 या वर्षी उत्पन्न वाढीचे दर कृषी क्षेत्र (4 टक्के), उद्योग (8.8 टक्के) सेवा क्षेत्र (9.3 टक्के) असतील असे पुर्वानुमान आहे.
  • 2012-13 मध्ये देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील राज्याचा हिस्सा 14.1 टक्क्यांवर घसरला आहे
  • 2012-13च्या खरीप रब्बी या दोन्ही हंगामात अन्नधान्य उत्पादनात 2011-12 वर्षाच्या तुलनेत अनुक्रमे 8.8 टक्के 18.2 टक्के घट आली आहे. एकूण अन्नधान्य उत्पादन 11.9 टक्के कमी झाले आहे. तेलबियांचे उत्पादन 13 टक्के वढ़ले ऊस उत्पादनात 13.3 टक्के घट झाली आहे. 2011-12 च्या तुलनेत कापूस उत्पादन 0.4 टक्क्यांनी कमी झाले आहे.
  • चालू किमतीनुसार 2012-13 मध्ये कृषि संलग्न कार्ये क्षेत्राचा स्थूल राज्य उत्पन्नातील वाटा 10.9 टक्के  (रू. 1,44,227 कोटी), उद्योग क्षेत्राचा वाटा 27.4 टक्के (रू. 3,62,212 कोटी) तर सेवा क्षेत्राचा वाटा 61.7 टक्के (रू. 8,17,329 कोटी) होता.
  • चालू किमतीनुसार 2012-13 मध्ये दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न रू.67,839 तर दरडोई निव्वळ राज्य उत्पन्न  रू. 1,03,991 होते.
  • राज्यातील 5 जिह्यांचे दरडोई निव्वळ उत्पन्न दरडोई निव्वळ राज्य उत्पन्नापेक्षा अधिक आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि नागपूर या जिह्यांचा समावेश होतो. राज्यातील 12 जिह्यांचे दरडोई उत्पन्न दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा (रू. 67,839) कमी आहे. यामध्ये उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड, जालना, हिंगोली, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, नंदुरबार, गोंदिया आणि गडचिरोली या जिह्यांचा समावेश होतो. नंदुरबार सोडल्यास सगळे जिल्हे विदर्भात मराठवाड्यात आहेत.
अधिक माहिती व संपूर्ण अहवालासाठी sparkmaharashtra@gmail.com किंवा ०२२-२४९०१००१/२ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment