नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Showing posts with label सिंचन क्षमता. Show all posts
Showing posts with label सिंचन क्षमता. Show all posts

Thursday, May 30, 2013

चिंतन सिंचनाचे

राज्यातील 50 टक्के लोक उदरनिर्वाहासाठी शेती संलग्न सेवांवर अवलंबून असल्याने शेतीची उत्पादकता उत्पादन वाढविणे हे ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे अंग आहे. सिंचनाचा मूलभूत उद्देश कृषी उत्पादनात भरीव वाढ करून ग्रामीण जीवन समृद्ध करणे हा आहे. कृषी क्षेत्राच्या उत्पादकतेमध्ये सिंचन व्यवस्थेचा वाटा महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्रात लहान-मोठ्या मिळून जवळजवळ 400 नद्या वाहतात. त्यांची एकंदर लांबी सुमारे 20 हजार कि.मी. आहेपरंतु सगळ्या नद्या बारामही नसल्याने सिंचनाचा प्रमुख स्त्रोत म्हणुन राज्यातील पाटबंधारे सुविधांचा प्रामुख्याने विचार होतो.
केंद्रीय जल आयोगाच्या एका अहवाला अनुसार देशात पूर्ण झालेली काम सुरू असलेली अशी एकूण 5, 101 धरणे आहेत. त्यापैकी सर्वाधिक 2,821 (35.7 टक्के) धरणे महाराष्ट्रात आहेत. असे असले तरी राज्यातील पिकाखालील क्षेत्रापैकी 17.9 टक्केच क्षेत्र सिंचनाखाली आहे. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 45.3 टक्के एवढे अधिक आहेभ्रष्टाचाराच्या वेढ्यात गुरफटलेल्या राज्यातील सिंचन क्षेत्रासंबंधी येथे विस्ताराने चर्चा केली आहे.

Monday, June 4, 2012

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

गोदावरी खोऱयातील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी द्रुतगतीने उपयोगात आणून खोऱयातील पाटबंधारे प्रकल्प, लाभक्षेत्र विकास प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प आणि ऊर्जा निर्मिती योजना इत्यादींना चालना देण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम क्र.23 अन्वये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची 17 ऑगस्ट, 1998 रोजी स्थापना करण्यात आली. तर मंडळाच्या कामकाजास 1 ऑक्टोबर, 1998 पासून सुरुवात झाली.
गोदावरी नदी सह्याद्रीच्या पर्वतरांगातून नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. पुढे ती अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड जिह्यातून वाहत आंध्र प्रदेशात जाते राजमहेंद्रीजवळ बंगाल उपसागरास मिळते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या हद्दीमध्ये उगमापासून ते राज्य सीमेपर्यंत मुख्य गोदावरी नदीची लांबी 732 कि.मी. आहे. महाराष्ट्राचे 10 जिल्हे या महामंडाळांतर्गत येतात.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या स्थापनेपूर्वी गोदावरी नदीवरील 9 मोठे, 58 मध्यम आणि 497 लघु प्रकल्प पूर्ण करण्यात आले होते. या एकूण 564 प्रकल्पातून फक्त 7.29 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली होती.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत 14 मोठे, 12 मध्यम आणि 158 लघु प्रकल्प बांधकामाधीन आहेत. या अहवालात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत असणाऱया मोठे, मध्यम लघु बांधकामाधीन प्रकल्पांचा आढावा या अहवालात घेतला आहे.