खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारे मिश्रण. खतात मुख्य दोन प्रकार असतात. रासायनिक (केमिकल) आणि सेंद्रिय व जैविक (ऑरगॅनिक आणि बायो) खत.
रासायनिक खतांचा वाढता वापर - रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे पिकांची उत्पादकता कमी होते व जमिनीचीही धूप होते. रासायनिक खतांचा अति व असमतोल वापर करून जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्यांचा (मायक्रोन्यूट्रियंट्स) नाश होतो. सुरुवातीला जरी रासायनिक खते वापरून पिकांची उत्पादकता वाढत असली तरी ते प्रमाण कालांतराने घटत जाते. भारतात हरित क्रांतीच्या आधी सेंद्रिय व जैविक खतांचाच वापर होत होता. हरित क्रांतीमुळे संकरित (हायब्रिड) बीज उत्पादन व्हायला लागले व या संकरित बीजातून जास्तीत जास्त उत्पादन काढायला रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु झाला.