नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Showing posts with label सेंद्रिय व जैविक खतांचा वापर. Show all posts
Showing posts with label सेंद्रिय व जैविक खतांचा वापर. Show all posts

Friday, December 9, 2011

खतांचा वापर आणि पिकांची उत्पादकता

खत म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारे मिश्रण. खतात मुख्य दोन प्रकार असतात. रासायनिक (केमिकल) आणि सेंद्रिय व जैविक (ऑरगॅनिक आणि बायो) खत.
रासायनिक खतांचा वाढता वापर - रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे पिकांची उत्पादकता कमी होते व जमिनीचीही धूप होते. रासायनिक खतांचा अति व असमतोल वापर करून जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्यांचा (मायक्रोन्यूट्रियंट्स) नाश होतो.  सुरुवातीला जरी रासायनिक खते वापरून पिकांची उत्पादकता वाढत असली तरी ते प्रमाण कालांतराने घटत जाते. भारतात हरित क्रांतीच्या आधी सेंद्रिय व जैविक खतांचाच वापर होत होता. हरित क्रांतीमुळे संकरित (हायब्रिड) बीज उत्पादन व्हायला लागले व या संकरित बीजातून जास्तीत जास्त उत्पादन काढायला रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरु झाला.