अर्थसंकल्पामुळे राज्याची स्थिती सुधारणार की नाही, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थीच असणार! त्याचा अन्वयार्थ लावणारा लेख...
Published in Loksatta : Thursday, March 21, 2013
महाराष्ट्रातील सिंचनात गेल्या काही वर्षांत किती वाढ झाली हा
मोठाच वादाचा विषय ठरला आहे. हजारो कोटींचा निधी खर्च होऊनही राज्याच्या
सिंचनात गेल्या दहा वर्षांत ०.१ टक्काच वाढ झाल्याचा दावा विरोधी पक्ष
करीत आहे. राज्य सरकारला तो मान्य नाही. आपण राज्य शासनाच्याच
प्रकाशनांच्या आधारे हा दावा करतो आहोत, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर शासनाने प्रकाशित केलेल्या श्वेतपत्रिकेने
विरोधकांचे समाधान झालेले नाही. विरोधी पक्षांच्या रेटय़ाने शासनाने विशेष
तपास पथकाची (एसआयटीची) स्थापना केलेली असली तरी त्यातून काही निष्पन्न
होणार नाही अशी भावना आता मूळ धरू लागली आहे. या सगळ्या आरोप-
प्रत्यारोपांच्या फैरीत सामान्य नागरिकांना मात्र खरे काय हे कळतच नाही.
याविषयी थोडी सुस्पष्टता यावी हा या लेखाचा उद्देश.