नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Showing posts with label पुरवणी मागण्या. Show all posts
Showing posts with label पुरवणी मागण्या. Show all posts

Monday, July 16, 2012

पुरवणी मागण्यांचे विश्लेषण, २०१२

पुरवणी मागण्यांचे विश्लेषण उपलब्ध आहे. हे विश्लेषण हवे असल्यास कृपया दालन क्रमांक १३२, विरोधी पक्ष नेता, विधान परिषद  कार्यालय, मधून स्पार्कच्या सहकाऱ्यांकडून  घ्यावे

Friday, August 5, 2011

पुरवणी मागण्या, जुलै 2011

 काही महत्त्वाची निरीक्षणे
मार्च 2011मध्ये अर्थसंकल्प सादर केल्यानंतर चारच महिन्यात करण्यात आलेल्या रु. 3 हजार 355 कोटी 65 लाख 53 हजारांच्या पुरवणी मागण्यांचे मूळ अर्थसंकल्पाशी प्रमाण केवळ 2.17 टक्के आहे. पुरवणी मागण्यांची रक्कम पाहता आर्थिक शिस्तीसाठी पुरवणी मागण्या कमी करण्यात वित्तमंत्र्यांनी यश मिळविले असे वाटत असतानाच पुरवणी मागण्यांचा तपशील पाहता मात्र आर्थिक बेशिस्तीची अनेक उदाहरणे दिसून येतात. थकीत बिलांच्या प्रदानासाठी मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्या तसेच जलसंपदा व नियोजन विभागांतर्गत अनेक लाक्षणिक मागण्या व त्यातून (केवळ 4 महिन्यात) मोठ्या प्रमाणावर झालेले पुनर्विनियोजन पाहता वित्तमंत्र्यांना आर्थिक शिस्तीसाठी कठोर पावले उचलावी लागतील, हे स्पष्ट आहे. पुरवणी मागण्यांसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण निरीक्षणे पुढील प्रमाणेः