नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Monday, June 4, 2012

शालेय शिक्षण

शाळाबाह्य मुलांची संख्याः
·      राज्यातील शाळाबाह्य मुलांची संख्या 2 लाख 7 हजार 345 आहे. 2011-12 ची योजना अंतिम करताना शाळाबाह्य मुलांची संख्या 28 हजार पेक्षा अधिक नसल्याची माहिती राज्याने दिलेली होती. मुंबईमध्ये एकही मूल शाळाबाह्य नसल्याचा दावा राज्याने केला होता. केंद्र शासनाने याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले होते.
शाळाबाह्य मुलांची संख्या काढताना शासन 2001 च्या जनगणनेनुसार मुलांची संख्या गृहीत धरते. 2011 च्या लोकसंख्येनुसार मुलांची संख्या गृहीत धरल्यास त्यातून शाळेत जाणाऱया मुलांची संख्या वजा केल्यास शाळाबाह्य मुलांची संख्या 64 लाखांपर्यंत जाते.

महिला व बालविकास विभाग

राज्य सरकारने महिला बालविकास या खात्यासाठी किती रुपयांची तरतूद केली होती आणि त्यातील किती प्रत्यक्षात खर्च झाले याची माहिती या अहवालात दिली आहे. तसेच या विभागांतर्गत राबविल्या जाणाऱया विविध योजनांचा गेल्या काही वर्षातील प्रत्यक्ष खर्च, अर्थसंकल्पीय अंदाज आणि सुधारित अंदाज यांचा आढावा घेण्यात आला आहे.


रुपये कोटीत
वर्ष
महिला बालविकास विभाग
राज्य अर्थसंकल्प
टक्के
2010-11 (प्रत्यक्ष खर्च)
1,633.47
1,31,005
1.25
2011-12 (अर्थ. अंदाज)
2,453.96
1,54,124
1.59
2011-12 (सुधारित अंदाज)
2,484.34
1,52,839
1.62
2012-13 (अर्थ. अंदाज)
2,738.99
1,70,110
1.61


गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

गोदावरी खोऱयातील महाराष्ट्राच्या वाट्याला आलेले पाणी द्रुतगतीने उपयोगात आणून खोऱयातील पाटबंधारे प्रकल्प, लाभक्षेत्र विकास प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प आणि ऊर्जा निर्मिती योजना इत्यादींना चालना देण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम क्र.23 अन्वये गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाची 17 ऑगस्ट, 1998 रोजी स्थापना करण्यात आली. तर मंडळाच्या कामकाजास 1 ऑक्टोबर, 1998 पासून सुरुवात झाली.
गोदावरी नदी सह्याद्रीच्या पर्वतरांगातून नाशिक जिह्यातील त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. पुढे ती अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड जिह्यातून वाहत आंध्र प्रदेशात जाते राजमहेंद्रीजवळ बंगाल उपसागरास मिळते. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या हद्दीमध्ये उगमापासून ते राज्य सीमेपर्यंत मुख्य गोदावरी नदीची लांबी 732 कि.मी. आहे. महाराष्ट्राचे 10 जिल्हे या महामंडाळांतर्गत येतात.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या स्थापनेपूर्वी गोदावरी नदीवरील 9 मोठे, 58 मध्यम आणि 497 लघु प्रकल्प पूर्ण करण्यात आले होते. या एकूण 564 प्रकल्पातून फक्त 7.29 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली होती.
गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत 14 मोठे, 12 मध्यम आणि 158 लघु प्रकल्प बांधकामाधीन आहेत. या अहवालात गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत असणाऱया मोठे, मध्यम लघु बांधकामाधीन प्रकल्पांचा आढावा या अहवालात घेतला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि महाराष्ट्राचे आरोग्य

गरीब, दुर्लक्षित तसेच गरजू ग्रामीण जनतेला सहजसाध्य, परवडण्याजोगी, कार्यक्षम, उत्तरदायी आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने संपूर्ण देशात एप्रिल, 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (2005-12) योजना सुरू केली होती. ही योजना येत्या 31 मार्च, 2012 रोजी संपत आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवांमध्ये कशाप्रकारे बदल झाले आहेत किंवा नाहीत, त्यात काही सुधारणा वा वाढ झाली आहे का? तसेच राज्यातील वैद्यकीय तज्ञांची उपलब्धता, जनगणनेनुसार राज्यात आरोग्य संस्था उपलब्ध आहेत का? आदी बाबींचा शासकीय अहवालांच्या आधारे आकडेवारीसह आढावा घेण्यात आला आहे.