अर्थसंकल्प तयार करताना ज्या
खर्चांचा अंतर्भाव करणे शक्य नव्हते, असे खर्च विधिमंडळाच्या निदर्शनास
आणून विधिमंडळाची मान्यता घेण्याच्या उद्देशाने पुरवणी मागण्या सादर केल्या जाणे अपेक्षित
आहे. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर वर्षभरात तीन वेळा पुरवणी मागण्या
सादर करण्याची संधी शासनाला मिळते. दिनांक 11 मार्च 2013 रोजी सादर करण्यात आलेल्या पुरवणी मागण्या
या वर्ष 2012-13 च्या तिसऱया पुरवणी मागण्या आहेत.
|
2012-13 चा अर्थसंकल्प व वर्षभरातील पुरवणी मागण्यांची रक्कम
रुपये कोटीत
|
पुरवणी मागण्यांची रक्कम एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत 10 टक्क्यांहून अधिक आहे. मार्च 2013 मधील आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी केलेल्या पुरवणी मागण्यांची रक्कम मागील
दोन पुरवणी मागण्यांच्या तुलनेत अधिक आहे.
|