अनुसूचित जाती उपयोजनेंतर्गत ऊर्जेसाठी मंजूर 54 कोटींपैकी एक पैसाही खर्च नाही
- अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, महिला व बालविकास, मागासवर्गीयांचे कल्याण आदी क्षेत्रे येतात. या विभागांतर्गत येणाऱया लाभार्थ्यांसाठी 12व्या पंचवार्षिक योजने अंतर्गत 28,050 कोटी रुपयांचा नियतव्यय निश्चित करण्यात आला आहे.
- 2012-13 या आर्थिक वर्षासाठी अनुसूचित जाती उपयोजनेच्या अंमलबजावणीसाठी 4,590 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता. यातील डिसेंबर-12 पर्यंत म्हणजे 9 महिन्यात फक्त 40 टक्के (रु. 1,853.95 कोटी) निधी खर्च करण्यात आला.
- जिल्हास्तरीय योजने अंतर्गत ऊर्जा विभागासाठी मंजूर झालेल्या 53.95 कोटीपैकी एकही पैसा 2012-13 मध्ये खर्च झालेला नाही.
- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी 2011-12 मध्ये 636.68 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यातील 514.63 कोटी रुपये खर्च झाले तर रुपये 122.05 कोटी अखर्चित राहिले.
- संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱया वीस टक्के बीज भांडवल योजनेचा 2011-12 मध्ये 159 लोकांनी लाभ घेतला होता. तर 2012-13 (डिसेंबर12 पर्यंत, 9 महिन्यात) मध्ये फक्त 87 लाभार्थींची नोंद झाली आहे.