नवीन सरकारचा पहिला अर्थसंकल्प वाचण्यासाठी येथे टीचकी मारा भाग 1 भाग 2

पुढील पावसाळी अधिवेशन 13 जुलै, 2015 ला मुंबईत होईल.


Showing posts with label दरडोई उत्पन्नातील विषमता. Show all posts
Showing posts with label दरडोई उत्पन्नातील विषमता. Show all posts

Thursday, May 30, 2013

महाराष्ट्राची आर्थिक पाहणी २०१२-२०१३

कृषी संलग्न क्षेत्रातील वाढीचा दर उणा (निगेटीव्ह) :
  •  स्थिर किमतीनुसार 2010-11 मधील स्थूल राज्य उत्पन्नात (रु.7,35,212 कोटी) 7.1 टक्के वाढ होऊन ते 2011-12 मध्ये रु. 7,87,426 कोटी इतके वाढले. हा वाढीचा दर 8.5 टक्के असेल असे अपेक्षित होते.
  • 2011-12च्या तुलनेत 2012-13 मध्येही स्थूल राज्य उत्पन्न  वाढीचा दर  7.1 टक्के एवढाच अपेक्षित असून  उत्पन्न  रु.8,43,565 कोटी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
  • 2012-13 या वर्षी कृषी संलग्न क्षेत्रातील वाढीचा दर उणे (-) 2.1 टक्के, उद्योग क्षेत्रातील वाढीचा दर 7.0 टक्के सेवा क्षेत्रातील वाढीचा दर 8.5 टक्के असा राहील.
  • 2011-12 मध्ये (चालू किमतीनुसार) देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील राज्याचा हिस्सा 14.4 टक्के आहे.