ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या मागण्या व एकूण अर्थसंकल्पातील विभागाचे स्थान
रुपये कोटीत
वर्ष
|
योजनेतर
|
योजनांतर्गत
|
एकूण
|
अर्थसंकल्पाशी प्रमाण
|
2010-11
|
3535
|
1247
|
4782
|
3.65
|
2011-12
|
4720
|
1333
|
6053
|
4.06
|
2012-13
|
6275
|
1918
|
8193
|
4.76
|
2013-14
|
6665
|
1800
|
8465
|
4.36
|
- विभागावर झालेल्या खर्चामध्ये योजनांतर्गत खर्चाचे प्रमाण 26.08 टक्के होते. योजनांतर्गत खर्चाच्या प्रमाणात मोठी घट झालेली असून 2013-14 साठी वर्तविण्यात आलेल्या अंदाजात योजनांतर्गत खर्चाचे प्रमाण केवळ 21.26 टक्के आहे.
- विभागावर होणाऱया महसुली खर्चासाठी रु. 7560 कोटींची तरतूद करण्यात आलेली असून एकूण खर्चात महसुली खर्चाचे प्रमाण 89 टक्के आहे. या खर्चापैकी 12 टक्के खर्च योजनांतर्गत स्वरुपाचा असून 2011-12 मध्ये हेच प्रमाण 15 टक्क्यांहून अधिक होते.
- महसुली खर्चापैकी 9.5 टक्के खर्च व्याजप्रदानांवर व 31 टक्के खर्च जिल्हा प्रशासनांवर होणार आहे.